परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या मनाप्रमाणे वागणारे वैद्यकीय, न्यायालयीन इत्यादी एकाही क्षेत्रात आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत. केवळ आध्यात्मिक परंपरांसंदर्भात मनाप्रमाणे वागतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

केवळ मनुष्य जन्मातच भगवद्धामात परत जाण्यासाठीची परमोच्च संधी !

आपण परमेश्‍वराचे अंश आहोत; पण काही कारणाने आपण या संसारी जीवनात पडलो आहोत. आता आपल्याला अशा रितीने उत्क्रांत व्हावयाचे आहे की, ज्यायोगे आपण भगवद्धामात परत जाऊ शकू. हीच परमोच्च संसिद्धी (संधी) होय !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदूंनो, स्वतःसमवेत राष्ट्र आणि धर्म यांचाही विचार करा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

सतत स्वार्थी विचारांचे वादळ मनात चालू असणारा माणूस झोपल्यानंतर चांगला दिसत नाही; मात्र बाळ छान दिसते; कारण त्याचे मन निर्मळ आणि सुंदर असते. असेच संतांचे आहे. वयाने मोठे असणारे संतही झोपल्यानंतर बाळासारखे सुंदर दिसतात !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून आरक्षण इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘डोळ्यांनी जंतू दिसत नाहीत; पण ते सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसत नाही, असे सूक्ष्मातीसूक्ष्म जग साधनेने कळते.’- (परात्पर  गुरु) डॉ. आठवले