परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कुणाची ओळख असल्याशिवाय होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

नामजप आणि यज्ञ

काही साध्य करण्यासाठी एखाद्याला नामजप अनेक दशके करावा लागतो. याउलट यज्ञ काही सात्त्विक पुरोहितांनी काही तास किंवा दिवस केल्यास २० – २५ किलोमीटर अंतरातील सहस्रो लोकांनाही त्याचा लाभ होतो. ’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधना  करून सूक्ष्मातील कळायला लागले की,  यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतिशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’-  (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या मनाप्रमाणे वागणारे वैद्यकीय, न्यायालयीन इत्यादी एकाही क्षेत्रात आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत. केवळ आध्यात्मिक परंपरांसंदर्भात मनाप्रमाणे वागतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

केवळ मनुष्य जन्मातच भगवद्धामात परत जाण्यासाठीची परमोच्च संधी !

आपण परमेश्‍वराचे अंश आहोत; पण काही कारणाने आपण या संसारी जीवनात पडलो आहोत. आता आपल्याला अशा रितीने उत्क्रांत व्हावयाचे आहे की, ज्यायोगे आपण भगवद्धामात परत जाऊ शकू. हीच परमोच्च संसिद्धी (संधी) होय !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदूंनो, स्वतःसमवेत राष्ट्र आणि धर्म यांचाही विचार करा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले