गुरुपौर्णिमेला २२ दिवस शिल्लक

चंद्र उगवताच चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो, त्याप्रमाणे केवळ अंतःकरणातल्या दयाद्रवाने गुरु शिष्याला तारतात.

गुरुपौर्णिमेला २३ दिवस शिल्लक

गुरु आतही आहेत आणि बाहेरही आहेत. तुम्ही अंतर्मुख व्हावे, अशी परिस्थिती गुरु निर्माण करतात. तुम्हाला आत्म्याकडे म्हणजेच ब्रह्माकडे ओढावे, म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात तयारी करत असतात.    

गुरुपौर्णिमेला २५ दिवस शिल्लक

गुरु आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून किंवा स्पर्शाने कृपेचा ओघ बुद्धीपुरस्सर भक्ताकडे लावतात. ही कृपा शिष्याला गुरूंच्या प्रयत्नाने दिलेली असते.               

गुरुपौर्णिमेला २६ दिवस शिल्लक

श्रीगुरूंच्या अनुग्रह शक्तीलाच गुरुपद म्हणतात. ते उपेय आहे, म्हणजेच उपायांच्या सहयोगाने त्याची प्राप्ती होते; परंतु श्रीगुरु हेच प्रत्यक्ष उपाय आहेत !    

मायेच्या मगरमिठीतून सुटायचे कसे ?

दुसर्‍यांवरील अवलंबित्व कमी केल्याने टप्प्याटप्प्याने मायेतून सुटत जाण्यास साहाय्य होणे

गुरुपौर्णिमेला २७ दिवस शिल्लक

सहजध्यान चालू करण्याकरता गुरूंची आवश्यकता भासते; कारण केवळ त्यांचीच अंतःस्थिती उच्च कोटीची असते. गुरूंमुळे चालू झालेले हे सहजध्यानच शेवटी योग्याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकते.

गुरुपौर्णिमेला ३० दिवस शिल्लक

वेद, शास्त्र, स्मृती इत्यादींच्या बहुवाक्यतेचे एकवाक्यीकरण गुरुकृपेने होते. बाह्यतः त्यांचे शब्दार्थ निराळे वाटले, तरी भावार्थ एकच कसा, हे गुरुकृपेने कळते.