गुरुपौर्णिमेला ३४ दिवस शिल्लक

नामावर श्रद्धा ठेवा. नाम हाच तुमचा गुरु आहे. नामच तुम्हाला मार्ग दाखवील ! – प.पू. भक्तराज महाराज

सनातन संस्थेचे महत्त्व

‘मुलाने आणि काही इतरांनी कसे चालावे ? बोलावे ? आणि वागावे ? हे त्यांचे आई-वडील किंवा हितचिंतक त्यांना शिकवतात; पण ‘ते कृतीत कसे आणावे ?’, हे ते शिकवत नाहीत. ते सनातन संस्था शिकवते.’

कलियुगात सनातनच्या साधकांसाठी असलेला संधीकाळ

‘कलियुगामध्ये परात्पर गुरुदेवांचे (डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे) अवतारी तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. साधकांनी याचा लाभ करून घ्यायला हवा. कलियुगात साधनेचा ‘संधीकाळ’ म्हणतात, तो हाच आहे.’

गुरुपौर्णिमेला ३७ दिवस शिल्लक

निरनिराळ्या योगमार्गांनी साधना करण्यात कित्येक वर्षे फुकट न घालवता, म्हणजे या सर्व मार्गांना डावलून, ते ‘गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची ?’ ते गुरुकृपायोगात साधक शिकतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने जलद उन्नती होते.