रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्‍या जिज्ञासूने व्यक्त केलेला अभिप्राय !

येथेच खरे हिंदुत्व जागृत असलेला समाज आहे’, असे वाटले.

इतिहासातील एकेका विषयातील चुकांची दुरुस्ती करण्यात वेळ देण्याऐवजी हिंदूंच्या सर्व समस्यांचे निराकरण करणार्‍या हिंदु राष्ट्राची स्थापना होणे महत्त्वाचे असणे !

साधकांना मार्गदर्शन करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

ग्रहणकाळात उपवास करण्यासंबंधीच्या लेखातील सूर्यास्तानंतर पाणी न पिण्याविषयीच्या सूत्रासंबंधी स्पष्टीकरण

वेधकाळात विनाअन्न उपवास करत असतांना पाणी प्यायल्यास चालते. ८ नोव्हेंबरच्या सूर्यास्तापासून ग्रहण संपेपर्यंत, म्हणजे साधारण २० मिनिटांच्या काळात मात्र पाणीही पिऊ नये. त्यामुळे लेखात दिलेले सूत्र योग्य आहे.’

साधकांनो, सध्या होणार्‍या विविध त्रासांवर मात करण्यासाठी स्वतःची साधना वाढवा !

‘सध्या अनेक साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास वाढले आहेत. त्रासांचे दिवसेंदिवस वाढत जाणारे हे प्रमाण आपत्काळ समीप आल्याचे दर्शवत आहे. ‘या आपत्काळातून तरून जाण्यासाठी स्वतःची साधना वाढवणे, हाच एकमेव पर्याय आहे’, हे साधकांनी लक्षात घ्यावे.

संतांनी साधनेविषयी केलेल्या अनमोल मार्गदर्शनानंतर त्यांना ‘धन्यवाद’ (थँक यू) न म्हणता ‘कृतज्ञता’ म्हणा !

‘व्यवहारामध्ये कुणी कोणत्याही प्रकारचे साहाय्य केले, तर आपण त्यांना ‘धन्यवाद’ म्हणतो. व्यवहारामध्ये ‘धन्यवाद’ हा शब्द सर्रास वापरला जातो; पण अध्यात्मात ‘धन्यवाद’ असे न म्हणता ‘कृतज्ञता’, असे म्हटले जाते.

२५.१०.२०२२ या दिवशी झालेल्या खंडग्रास सूर्यग्रहणाच्या दिवशी आधी झालेल्या ग्रहणांच्या तुलनेत आध्यात्मिक त्रास न्यून जाणवणे

‘ग्रहणकाळात वातावरणातील वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो. त्यामुळे प्रतिवर्षी ग्रहणाच्या कालावधीत साधकांना पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक त्रास होतात. त्यांच्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण येते.’

लक्ष्मीदेवी कुणाकडे वास करते ?

जिथे स्वच्छता, शोभा आणि रसिकता आढळते, तिथे तर ती आकर्षित होतेच; शिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त, तसेच क्षमाशील पुरुष आणि गुणवती अन् पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.

अभ्यंगस्नानाचे महत्त्व !

अभ्यंगाने, म्हणजेच स्नानापूर्वी तेल लावण्याने पिंडातील चेतनेतील प्रवाहाला अभंगत्व, म्हणजेच अखंडत्व प्राप्त होते. स्नानापूर्वी देहाला तेल लावल्याने पेशी, स्नायू आणि देहातील पोकळ्या जागृत अवस्थेत येऊन पंचप्राणांना कार्यरत करतात. पंचप्राणांच्या जागृकतेमुळे देहातील टाकाऊ वायू ढेकरा, जांभया इत्यादींद्वारे बाहेर पडतात.