कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग
सोलापूर, ११ जुलै (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येथील ‘बी.आर्. न्यूज’ या स्थानिक वृत्तवाहिनीवर ‘गुरुपौर्णिमा विशेष’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सनातन संस्थेच्या कु. वर्षा जेवळे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांचा सहभाग होता, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अंजली बंडेवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रक्षेपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे १३ जुलै या दिवशी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय ?’, ‘जीवनातील गुरूंचे महत्त्व’, ‘गुरुपरंपरेमुळे समाजाला झालेला लाभ’ यांविषयी माहिती देण्यात आली आहे. सोलापूरवासियांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. ‘बी.आर्. न्यूज’ या प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या माध्यमातून २ लाख कुटुंबांपर्यंत गुरुपौर्णिमेचे महत्त्व पोचणार आहे.