रांची (झारखंड) येथे मदरशांमध्ये बलपूर्वक डांबून ठेवलेल्या ६०० विद्यार्थिनींची पोलिसांकडून सुटका

दळणवळण बंदी असतांनाही मुलींना मदरशात डांबले !

कोरोनाचे संकट आलेले असतांना मशिदी आणि मदरसे बंद न करणारे, तसेच विद्यार्थिनींचा जीव धोक्यात घालणारे जनताद्रोही आहेत, हे लक्षात घ्या ! 

रांची (झारखंड) – येथील परहेपाट गावातील मदरशामध्ये २४ मार्च या दिवशी पोलिसांनी डांबून ठेवलेल्या ६०० विद्यार्थिनींची सुटका केली. ‘दळणवळण बंदी’ असतांनाही या मुलींना बळजोरीने मदरशामध्ये शिक्षण दिले जात होते. मदरशांतील एका मुलीने तिच्या पालकांना याविषयी कळवले. यानंतर पालकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. मुलींच्या पालकांनी सांगितले की, मदरशाच्या संचालकांना सांगितले होते की, मुलींना सुटी देण्यात यावी; मात्र त्यांनी ती दिली नाही आणि मुलींशी भेटूही दिले नाही.