पोलिसांनी विरोध केल्यावर धर्मांधांकडून गोंधळ

दळणवळण बंदी असतांनाही मेरठमध्ये मशिदीमध्ये नमाजपठण करण्याचा प्रयत्न

देशातील हिंदूंनी उत्स्फूर्तपणे प्रमुख मंदिरांसह लहान-मोठी मंदिरे लगेच बंद केली; मात्र मशिदी, चर्च बंद करण्यात आली नाहीत. यातून सामाजिक भान कुणामध्ये आहे, हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. याविषयी स्वतःला पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी म्हणणारे यावर काही बोलणार नाहीत, हेही तितकेच खरे !

मेरठ (उत्तरप्रदेश) – देशात दळणवळण बंदी घोषित केली असतांना मशिदींमध्येही नमाजपठणही बंद करणे अपेक्षित होते; मात्र येथील धर्मांधांकडून मशिदीमध्ये नमाजपठण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी त्यांना रोखले असता धर्मांधांकडून गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.

‘जनता कर्फ्यू’च्या दिवशी सायंकाळी ६ च्या सुमारास काही ठिकाण मशिदींमध्ये नमाजपठणासाठी जाण्यासाठी मोठ्या संख्येने धर्मांध घरातून बाहेर पडले होते. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी पोलिसांना विरोध केला. ‘जर तुम्ही माघारी गेला नाहीत, तर कायदेशीर कारवाई करावी लागेल’, अशी चेतावणी पोलिसांनी दिल्यावरही ते माघारी न गेल्याने पोलिसांनी त्याला बलपूर्वक पिटाळून लावले. (धर्मांध कायद्याला आणि नियमांना जुमानत नाहीत, हेच यातून दिसून येते ! – संपादक) या वेळी चित्रीकरणही करण्यात आले. यानंतर अनेक मशिदीबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.