आम्ही अमेरिकेचे ड्रोन पाडलेले नाही ! – रशिया

रशियाच्या लढाऊ विमानांनी १५ मार्चला अमेरिकेचे ड्रोन ‘एम्क्यू-९’ पाडले, असा आरोप अमेरिकेने केला आहे.

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अद्यापही अटक नाही !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्याचे प्रयत्न गेल्या २४ घंट्यांपासून पाकिस्तानचे पोलीस करत आहेत. पोलीस लाहोर येथील जमान पार्कमध्ये इम्रान खान यांच्या अटकेसाठी पोचलेले आहेत; मात्र त्यांच्या समर्थकांकडून होत असलेल्या हिंसारचारामुळे पोलीस इम्रान यांना अटक करू शकलेली नाहीत.

अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संयुक्त सैनिकी सराव रोखा !

अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात १३ मार्चपासून चालू झालेला संयुक्त सैनिकी सराव रोखावा, अशी मागणीउत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांनी संयुक्त राष्ट्रांकडे केली.

हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात कराचीमध्ये ३० मार्चला विधानभवनावर मोर्चा

अल्पसंख्यांकांच्या अधिकारासाठी कार्य करणार्‍या ‘पाकिस्तान दारावर इत्तेहाद (पीडीआय)’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

पाकिस्तान हा आतंकवाद्यांचा निर्यातदार  ! – भारत

काश्मीरचा राग आळवल्यामुळे भारताने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर पाकिस्तानला चपराक लगावली आहे. ‘आंतरसंसदीय संघा’मध्ये बोलतांना प्रथम पाकिस्तानच्या प्रतिनिधीने काश्मीरचा उल्लेख केला. त्यांचे संबोधन संपल्यानंतर  प्रत्युत्तर देतांना भारताने पाकिस्तानला ‘आतंकवाद्यांचा निर्यातदार’ असे संबोधले म्हटले.

आमची बँकींग प्रणाली पूर्णपणे सुरक्षित ! – राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर बँक दिवाळखोर झाल्यानंतरही अमेरिकेतील बँकींग प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला.

प्रगतीसाठी लोकसंख्या नियंत्रणात आणण्याची आवश्यकता ! – पाकचे माजी अर्थमंत्री

ते म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येमुळे पाकिस्तान मानव विकास निर्देशांकात एकदम तळाशी आहे. शाश्‍वत आणि जलद विकासासाठी पाकिस्तानला लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल.

पाकमधील सिंध प्रांतात हिंदूंना पाणीपुरवठा करण्यास नकार !

हिंदु समाजातील लोकांना गावातून हाकलले !

अंतराळात तार्‍याजवळ सापडले पाणी : पृथ्वीवरील समुद्राचे रहस्य उलगडणार !

‘आपल्या सौरमालेत पाणी कुठून आले ?’, हा अंतराळाशी संबंधित अनेक प्रश्‍नांपैकी हा एक प्रश्‍न आहे, ज्याचे उत्तर वैज्ञानिक शोधत आहेत. नुकतीच शास्त्रज्ञांनी एक तारा प्रणाली शोधून काढली आहे, ज्यामुळे आपल्याला या रहस्याची कल्पना येऊ शकते.