अंतराळात तार्‍याजवळ सापडले पाणी : पृथ्वीवरील समुद्राचे रहस्य उलगडणार !

वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘आपल्या सौरमालेत पाणी कुठून आले ?’, हा अंतराळाशी संबंधित अनेक प्रश्‍नांपैकी हा एक प्रश्‍न आहे, ज्याचे उत्तर वैज्ञानिक शोधत आहेत. नुकतीच शास्त्रज्ञांनी एक तारा प्रणाली शोधून काढली आहे, ज्यामुळे आपल्याला या रहस्याची कल्पना येऊ शकते. शास्त्रज्ञांनी उत्तर चिलीमध्ये ‘अटकामा लार्ज मिलिमीटर अ‍ॅरे ऑफ टेलिस्कोप’ (ए.एल्.एम्.ए.) वापरून १ सहस्र ३०० प्रकाश-वर्षे दूर असलेल्या एका तार्‍याचे निरीक्षण केले. ‘व्ही ८८३ ओरियोनिस’ असे या तार्‍याचे नाव आहे. या तार्‍याभोवती वायू आणि धूळ यांची चक्रे आहेत.