केसांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी खोबरेल तेल लावा !

‘डबल रिफाइण्ड’, ‘ट्रिपल रिफाइण्ड’ यांसारखी तेलेही केसांना अपायकारक असतात. त्यांपेक्षा घाण्यावर काढलेले शुद्ध खोबरेल, तिळाचे किंवा सरकीचे तेल केसांना लावावे.

शांत निद्रा आणि डोळ्यांचे आरोग्य राखणे यांसाठी करावयाच्या कृती

रात्री झोपतांना डोक्याला भरपूर तेल लावल्यास शांत झोप लागते. तेल टाळूत जिरवावे. सकाळी अभ्यंगासाठी वापरतो त्याप्रमाणे कापूरमिश्रित तेल डोक्याला लावावे.

आयुर्वेदाला विसरून स्वत:ची आणि देशाची हानी करणारे भारतीय !

आपल्याकडील स्वदेशी औषधी म्हणजे आयुर्वेद !आपल्या ऋषिमुनींनी खोलवर अभ्यास करून, खडतर तपश्‍चर्या, म्हणजेच साधना करून मंत्र सिद्ध करून घेतले आणि आम्हाला किती मोलाचा हा खजिना दिला आहे.

३००० वर्षांपासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा लाभलेला आयुर्वेद !

‘आयुर्वेद’ हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशा प्रकारे होतो. आयुर्वेदाचा प्रारंभ ब्रह्मापासून झाला आहे’, असे मानले जाते.

पारंपरिक आयुर्वेदीय घटकांचे लाभ जाणा !

अभ्यंगामुळे अंगाला लागलेले अतिरिक्त तेल उटणे लावल्याने जाते. यासाठी ‘(सनातन) उटणे’, हरभर्‍याचे किंवा चण्याचे पीठही वापरू शकतो. उटणे लावल्याने चरबी न्यून होण्यास साहाय्य होते. त्यामुळे स्थूल माणसांनी उटणे लावावेच.

दैनंदिन जीवनात आयुर्वेदाला प्राधान्य द्यायला हवे ! – वैद्य खडीवाले, वैद्यक संशोधन संस्था

आपल्या दातांचे आरोग्य आम्ही कडूलिंब, बाभूळ, करंज इत्यादींच्या मऊ काड्यांच्या दंतधावनाने चांगले ठेवू शकतो. पुष्कळ वर्षांपूर्वी जर्मनीत जगातील तीनशेच्या वर विविध वनस्पतींचे संशोधन दातांच्या आरोग्यासाठी झाले.

नाकात तूप आणि कानात तेल का घालावे ?

नस्य केल्याने मेंदूला शक्ती मिळते. डोकेदुखी, खांदेदुखी, केस गळणे किंवा पांढरे होणे, दोन नाकपुड्यांमधील पडदा (Nasal septum) एका कडेला सरकणे, दमा, जुनाट सर्दी, जुनाट खोकला यांसारख्या विकारांमध्ये, तसेच मानेच्या वरच्या भागाच्या आरोग्यासाठी प्रतिदिन नस्य करणे लाभदायक आहे.

अ‍ॅलोपॅथीच्या उपचारांनी बरी न होणारी कावीळ आयुर्वेदीय औषधांनी बरी होणे

आयुर्वेदीय उपचारांनी मी बरी झाले. हा अनुभव मी स्वतः घेतल्यामुळे कावीळ हा रोग आयुर्वेदीय उपचारांनीच बरा होणारा आहे, हे निश्‍चित झाले.

खोबरेल तेल – एक बहुगुणी औषध

धुळीची अ‍ॅलर्जी असणार्‍यांनी दिवसातून ५-६ वेळा खोबरेल तेलाच्या बाटलीत १ करंगळी बुडवून तिला लागलेले तेल नाकपुड्यांना आतून लावावे. यामुळे नाकात येणारी धूळ तेलाला चिकटल्याने श्‍वसनमार्गात जात नाही आणि धुळीपासून होणारे त्रास न्यून होतात.

आयुर्वेद हे विलंबाने नव्हे, तर लगेच गुण देणारे शास्त्र !

बहुतेक वैद्य रुग्णाची प्रकृती, रोगाची कारणे इत्यादींचा विचार न करता अ‍ॅलोपॅथीच्या धर्तीवर आयुर्वेदीय उपचार करत (चिकित्सा देत) असल्याने आणि रुग्णही पथ्ये इत्यादी नीट पाळत नसल्याने ‘आयुर्वेदीय औषधांनी विलंबाने गुण येतो’, हा अपसमज रूढ झाला आहे.’