३००० वर्षांपासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा लाभलेला आयुर्वेद !

‘आयुर्वेद’ हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशा प्रकारे होतो. आयुर्वेदाचा प्रारंभ ब्रह्मापासून झाला आहे’, असे मानले जाते. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला अनुमाने ३००० वर्षांपासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे.

(संदर्भ : संकेतस्थळ)