अंघोळ झाल्यावर केसांना तेल लावावे. केस किंचित ओले असतांना तेल लावल्यास ते चांगले लागते. तेल लावतांना ते केसांच्या मुळांना लागेल असे लावावे. यामुळे केस गळणे आणि केस पांढरे होणे न्यून होते. सध्या पेठेत (बाजारात) तेलकटपणा नसलेली केसांसाठीची तेले मिळतात. त्यांमध्ये वनस्पती तेल नसून खनिज तेल असते. अशा तेलांचा केसांसाठी काहीही लाभ नसतो. ‘डबल रिफाइण्ड’, ‘ट्रिपल रिफाइण्ड’ यांसारखी तेलेही केसांना अपायकारक असतात. त्यांपेक्षा घाण्यावर काढलेले शुद्ध खोबरेल, तिळाचे किंवा सरकीचे तेल केसांना लावावे. (संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ)