भाजप आणि राष्‍ट्रवादी यांच्‍या नेत्‍यांनी केली शपथविधीच्‍या सिद्धतेची एकत्रित पहाणी !

मुंबई – भाजप आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस यांच्‍या नेत्‍यांनी २ डिसेंबर या दिवशी शपथविधीच्‍या सिद्धतेची एकत्रित पहाणी केली. विशेष म्‍हणजे या वेळी शिवसेनेचा एकही नेता उपस्‍थित नव्‍हता. आझाद मैदानावरील सोहळ्‍याच्‍या सिद्धतेची पहाणी करण्‍यासाठी भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर यांसह राष्‍ट्रवादी काँग्रेसचे काही नेते उपस्‍थित होते.