राजधानीत सिगारेटसाठी पैसे न दिल्याने अल्पवयीन मुलाची हत्या !

 गुन्ह्यांच्या संख्येत तब्बल ३२८ टक्क्यांनी वाढ ! समाज धर्महीन झाल्यानेच गुन्हेगारीत वाढ झाली, हे लक्षात घ्या !

‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक महंमद जुबैर यांच्याविरोधात गुन्हा नोंद

त्यांनी ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील एका चर्चासत्रावरून ट्वीट करत यति नरसिंहानंद सरस्वती, महंत बजरंग मुनि आणि आनंद स्वरूप यांना ‘घृणा पसरवणारे’ म्हटले होते.

‘हदीस’मध्ये जे चुकीचे आहे, ते त्वरित हटवा !

नूपुर शर्मा आणि भाजप यांच्यावर आक्रमण करण्याऐवजी ‘हदीस’ची निश्‍चिती का करत नाही ? मुसलमान नेत्यांनी यासाठी पुढे आले पाहिजे आणि जे चुकीचे आहे, ते त्यातून त्वरित हटवले पाहिजे.

(म्हणे) ‘तुम्ही गुप्तांगांची पूजा का करता ? तुमचा त्याच्याशी काय संबंध ?’

हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी अशी विधाने करणार्‍यांच्या विरोधात भारत सरकार कधी कारवाई करणार ? अशांवर पोलीस स्वतःहून गुन्हा नोंद करून कारवाई का करत नाहीत ? हिंदूंच्या संघटना याविषयी निष्क्रीय का आहेत ?

नूपुर शर्मा यांचे विधान वैध कि अवैध, ते न्यायालय ठरवेल ! – विश्‍व हिंदु परिषद

जर असे आहे, तर ‘भाजपने नूपुर शर्मा यांना निलंबित का केले ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !

‘अल् कायदा’कडून भारतात आत्मघाती आक्रमणे करण्याची धमकी  

जिहादी आतंकवादी संघटनांना धर्म असतो, हेच यातून स्पष्ट होते ! आता अशांना आतापर्यंत पाठीशी घालणारे निधर्मीवादी आणि राजकीय पक्ष गप्प का आहेत ?

काश्मीरप्रश्नी भारताला विरोध करणाऱ्या देशांकडे भारताने लक्ष देऊ नये ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

इस्लामी देशांकडून भारताला होणारा विरोध आणि क्षमा मागण्याची करण्यात येणारी मागणी, हे महत्त्वाचे नाही. भारत अशा लहानसहान प्रतिक्रियांमळे त्रस्त होऊ शकत नाही

भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा पाठिंबा !

भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. तरी काही हिंदुत्वनिष्ठांकडून त्यांना पाठिंबा मिळत आहे.

निवृत्त सैन्याधिकार्‍याकडून ‘धार्मिक स्थळ कायदा १९९१’च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

याचिकेत म्हटले आहे की, हा कायदा मुसलमान आक्रमणकर्त्यांनी हिंदूंच्या पाडलेल्या प्राचीन मंदिरांना नियंत्रणात ठेवण्याचा कायदेशीर अधिकार देतो. हा कायदा हिंदूंच्या मूलभूत अधिकारांचे हनन करतो.

आम्ही सर्व धर्मांचा मान राखतो ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ता स्टीफन दुजारिक यांनी म्हटले की, मी नूपुर शर्मा यांच्याविषयीचे वृत्त वाचले आहे; मात्र त्यांचे विधान ऐकलेले नाही.