‘अल् कायदा’कडून भारतात आत्मघाती आक्रमणे करण्याची धमकी  

महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानाचे प्रकरण

नवी देहली – ‘महंमद पैगंबर यांच्या सन्मानासाठी आम्ही स्वत:ला उडवून देण्यासाठी सिद्ध आहोत, असे सांगत जिहादी आतंकवादी संघटना अल्-कायदा हिने भारतात आत्मघाती आक्रमणे करण्याची धमकी दिली आहे. भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्या केलेल्या कथित अवमानावरून ही धमकी देण्यात आली आहे. ‘अल-कायदा इन द सबकॉन्टीनंट’ (भारतीय उपमहाद्वीपमध्ये अल् कायदा – एक्यूआयएस्) या आतंकवादी संघटनेने भारतातील उत्तरप्रदेश, देहली, गुजरात आणि मुंबई येथे आक्रमणे करण्याची धमकी दिली आहे.

१. या संघटनेने पत्रक जारी केले आहे. त्यात ‘भगवे आतंकतवादी’ असा उल्लेख करत ‘भारतियांनी आक्रमणासाठी सिद्ध रहावे. त्यांना ना त्यांच्या घरात आश्रय मिळणार, ना त्यांच्या सैन्य छावण्यांमध्ये’, असे म्हटले आहे. (हिंदू ‘भगवे आतंकवादी’ असते, तर अल् कायदाला अशी धमकी देण्याचे धाडस झाले असते का ? आणि अशा धमकीनंतर हिंदू गप्प राहिले असते का ? – संपादक)

२. पुढे म्हटले आहे की, जे आपल्या प्रेषितांचा अपमान करतात त्यांना आम्ही ठार मारले पाहिजे. जे आपल्या प्रेषितांविषयी अपशब्द वापरतात त्यांना उडवून लावण्यासाठी आपण स्वत:समवेत स्वत:च्या मुलांच्या अंगावरही स्फोटके बांधून आक्रमण केले पाहिजे. त्यांना यासाठी कोणतीही क्षमा मिळणार नाही. हे प्रकरण निंदा किंवा दुःखाच्या कोणत्याही शब्दांनी शांत होणार नाही.

संपादकीय भूमिका

  • जिहादी आतंकवादी संघटनांना धर्म असतो, हेच यातून स्पष्ट होते ! आता अशांना आतापर्यंत पाठीशी घालणारे निधर्मीवादी आणि राजकीय पक्ष गप्प का आहेत ?
  • हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ म्हणत टीका केली जाते; मात्र हिंदूंनी कधी त्यांच्या धर्माचा अवमान केल्यावरून कधी अशी धमकी दिली आहे का ?