निवृत्त सैन्याधिकार्‍याकडून ‘धार्मिक स्थळ कायदा १९९१’च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

नवी देहली – धार्मिक स्थळ कायदा १९९१ (प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट) याच्या विरोधात निवृत्त कर्नल अनिल कबोत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यापूर्वीही या कायद्याच्या विरोधात काही याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. अनिल कबोत्रा यांनी या याचिकेद्वारे या कायद्याच्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान दिले आहे.

याचिकेत म्हटले आहे की, हा कायदा मुसलमान आक्रमणकर्त्यांनी हिंदूंच्या पाडलेल्या प्राचीन मंदिरांना नियंत्रणात ठेवण्याचा कायदेशीर अधिकार देतो. हा कायदा हिंदूंच्या मूलभूत अधिकारांचे हनन करतो.