नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर १९ राजकीय पक्षांचा बहिष्कार

संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्याची मागणी करत देशातील १९ विरोधी पक्षांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांची नावे मतदार सूचीमध्ये येण्यासाठी सरकार नवीन पद्धत आणणार ! – अमित शहा

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांची नावे मतदार सूचीमध्ये येण्याकरता प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ही प्रक्रिया सुलभ व्हावी याकरता केंद्र सरकार एक नवी पद्धत आणणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

२ सहस्र रुपयांच्या नोटा ओळखपत्राविना पालटण्याच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

श्री. उपाध्याय यांच्या याचिकेमध्ये रिझर्व्ह बँकेचा निर्णय मनमानी, तर्कहीन आणि राज्यघटनेच्या कलम १४ चे उल्लंघन आहे, असे म्हटले आहे.

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये कोणत्याही ओळखपत्राविना पालटू शकता २ सहस्र रुपयांच्या नोटा !

१९ मे या दिवशी रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची घोषणा केल्यावर सामाजिक माध्यमांतून त्या जमा करण्यासंदर्भात अनेक उलट-सुलट गोष्टी पसरवल्या जात आहेत.

देहलीतील शाळेत हिंदु मुलांच्या मनगटावरील लाल दोरे कापणार्‍या शिक्षकांचे आंदोलनानंतर निलंबन !

अशा प्रकारची कृती करणार्‍यांना आता कठोर शिक्षा करण्याचा कायदा केला पाहिजे, तरच अशा घटनांवर चाप बसेल !

खलिस्तानी समर्थक आतंकवादी अमृतपाल सिंह याला ‘एन्.आय.ए.’ ने घेतले कह्यात !

खलिस्तान टायगर फोर्सशी संबंधित असलेल्या आतंकवादी अमृतपाल सिंह याला नुकतेच फिलिपाइन्समधून भारतात आणण्यात आले. अमृतपाल सिंह देहली विमानतळावर येताच राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) त्याला अटक केली.

कुनो नॅशनल पार्कमधील चित्ते दुसरीकडे हलवावेत !  – सर्वोच्‍च न्‍यायालय

मध्‍यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्‍ये आफ्रिकेतून आणलेल्‍या चित्त्यांपैकी ३ चित्त्यांचा गेल्‍या २ मासांत मृत्‍यू झाला. यावरून सर्वोच्‍च न्‍यायालयाने चिंता व्‍यक्‍त करत ‘त्‍यांना दुसर्‍या उद्यानात हलवण्‍याचा विचार करावा’, असे सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी २८ मे या दिवशी करणार नव्या संसद भवनाचे उद्घाटन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते २८ मे या दिवशी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ‘सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पां’तर्गत ही इमारत बांधण्यात आली आहे.

ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण आणि शिवलिंगाची चाचणी करण्यावर पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

अलाहाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वी हे सर्वेक्षण आणि चाचणी करण्याची अनुमती दिली होती. याला ज्ञानवापी मशीद प्रबंधन समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अशी स्थगिती दिली.