केसतोड (गळू) या विकारावर सोपा घरगुती उपचार

. . . केसतोड किंवा गळू झालेल्‍या ठिकाणी या कापसाच्‍या चकतीने शेक देऊन चिंधीच्‍या साहाय्‍याने ती चकती केसतोडावर बांधावी. दिवसा बांधलेला कापूस रात्री आणि रात्री बांधलेला दिवसा काढावा (सोडावा) आणि बरे होईपर्यंत पुन्‍हा याच पद्धतीने बांधावा.

गुढीपाडव्याला कडूनिंबाच्या पानांची चटणी का खातात ?

कडूनिंबाची पाने चवीला कडू असतात. कडू चवीच्या पदार्थांमध्ये आकाश आणि वायु ही महाभूते प्रामुख्याने असतात. ही महाभूते कफातील महाभूतांच्या विरुद्ध गुणधर्माची आहेत. कडूनिंबाची चटणी खाल्ल्याने कफाचे विकार नियंत्रणात रहाण्यास साहाय्य होते.

सर्दी, खोकला, ताप यांसारख्या विकारांमध्ये शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी टाळावे !

तापामध्ये कफ न वाढवणारा आहार घेणे आवश्यक असते. त्यामुळे ताप आलेला असतांना शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी पिणे टाळावे.’

संप्रेरकांच्‍या (‘हॉर्मोन्‍स’च्‍या) असंतुलनावर आरोग्‍यासंबंधीच्‍या स्‍वयंशिस्‍तीने मात करा !

आजकाल बहुतेकांकडून कधीही झोपणे, उठणे, काहीही आणि कधीही खाणे यांसारखे आरोग्‍यासंबंधीचे बेशिस्‍त वर्तन होत असते. ‘स्‍वयंशिस्‍त’ असेल तर शरिरातील संप्रेरकांचे बिघडलेले चक्र पुन्‍हा नीट होऊ लागते.

शौचालयामध्‍ये चपलेचा वापर करणे अत्‍यावश्‍यक का आहे ?

शौचालयामध्‍ये चपलेचा वापर निश्‍चितच करा आणि प्रत्‍येक वेळी पायांची स्‍वच्‍छता योग्‍य प्रकारे करा. यामुळे शरिरात कृमी प्रवेशित होण्‍याचा एक मार्ग आपण बंद करू शकू आणि निरोगी राहू शकू !

सकाळचा पहिला आहार पोटातील ‘मार्ग’ मोकळा असतांनाच घ्‍यावा !

सकाळी शौचाला, तसेच लघवीला साफ होणे, खालून (गुदद्वारातून) वात सरणे, ढेकर आल्‍यास त्‍याला अन्‍नाचा वास नसणे, शरीर हलके असणे, घसा स्‍वच्‍छ असणे आणि सडकून भूक लागणे, ही पोटातील ‘मार्ग’ मोकळा असल्‍याची लक्षणे आहेत.

त्रिदोषांवर (वात, कफ आणि पित्त) आयुर्वेदाची चिकित्‍सा अन् आहार !

या लेखात वाढलेल्‍या दोषांवर आयुर्वेदाची कोणती चिकित्‍सा करायला हवी ? आणि कोणत्‍या प्रकारचा आहार घ्‍यायला हवा ? ते येथे देत आहोत.

शांत निद्रेसाठी, तसेच केसांच्‍या आरोग्‍यासाठी प्रतिदिन झोपतांना डोक्‍याला तेल लावा !

बर्‍याच जणांना रात्री लवकर झोप न लागणे, तसेच मध्‍ये जाग आली, तर पुन्‍हा झोप न लागणे यांसारखे त्रास असतात. प्रतिदिन रात्री झोपतांना डोक्‍याला तेल लावल्‍यास हा त्रास बरे होण्‍यास साहाय्‍य होते.

व्‍यायामाविषयी उदासीनता नको !

‘अनेक रोगांवरील विनामूल्‍य औषध असलेला व्‍यायाम न करता लोक प्रतीमास सहस्रावधी रुपयांची औषधे घेण्‍यात धन्‍यता मानतात’, याला काय म्‍हणावे ?’

तापातून लवकर बरे होण्यासाठी खाण्याजोगे पदार्थ !

ताप आलेला असतांना शरिराची सर्व यंत्रणा तापातून बरे होण्याचा प्रयत्न करत असते. अशा वेळी दूध, दही, पोळी, सुकामेवा, फळे यांसारखे पचायला जड पदार्थ खाऊ नयेत.