
१. इतरांचे कौतुक करणे
‘श्रीमती शिंदेआजींचे सुपुत्र सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ. मीनल हे ठाणे सेवाकेंद्रात रहात असतांना शिंदेआजी ४ दिवस ठाणे सेवाकेंद्रात रहायला आल्या होत्या. तेव्हा साधिकांनी कोणताही पदार्थ केला, तरीही शिंदेआजी साधिकांचे कौतुक करत असत आणि स्वतःच्या नातेवाइकांनाही साधिकांविषयी कौतुकाने सांगत असत.
२. आज्ञापालन

त्या सद्गुरु राजनदादा यांच्याकडे मुलगा म्हणून न पहाता ‘सद्गुरु’ म्हणूनच पहात असत आणि त्यांनी सांगितलेले आजी सर्व ऐकत असत. सद्गुरु दादांनी सांगितलेले नामजपादी उपाय आजी करत असत.
३. प्रेमभाव
आजी पुष्कळ रुग्णाईत असतांना एकदा मी त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा त्यांनी ‘तू बरी आहेस ना ?’, अशी माझी विचारपूस केली. त्यांनी त्यांच्या सूनबाईंना (सौ. मीनलताईंना) मला खाऊ देण्यास सांगितले.
४. कृतज्ञताभाव
मी त्यांना भेटल्यावर त्या प्रत्येक वेळी ‘प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आपल्यासाठी किती करतात ! त्यांच्यामुळे मी आहे’, असे सांगत असत.
‘गुरुमाऊलींच्या कृपेनेच शिंदेआजींचे गुण माझ्या लक्षात आले आणि लिहून देता आले’, त्याबद्दल मी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’
– सुश्री नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.१.२०२६)
|
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद