
वॉशिंग्टन / तेहरान – अमेरिका इराणवर आक्रमण करण्याची सिद्धता चालू असल्याच्या घडामोडी होत असतांनाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प नरमले आहेत, असे वृत्त समोर आले आहे. ट्रम्प म्हणाले की, इराणमध्ये निदर्शकांवर झालेल्या कारवाईत मृतांची संख्या अल्प होत आहे आणि सध्या सामूहिक फाशीची कोणतीही योजना नाही. ट्रम्प यांच्या या पालटलेल्या भूमिकेच्या मागे सौदी अरेबिया, कतार आणि ओमान यांची मुत्सद्देगिरी असल्याचे म्हटले जात आहे.
अमेरिका आणि इराण एकमेकांसमोर उभे ठाकले !
इराणमधील आंदोलकांवरील दडपशाहीच्या विरोधात अमेरिकेने इराणवर सैनिकी कारवाईची उघड धमकी दिली होती. अमेरिकेला प्रत्युत्तर देत इराणनेही ‘आखातातील अमेरिकेच्या सैनिकी तळांवर आक्रमण करू’, अशी चेतावणी दिली होती. त्यामुळे कतारच्या ‘अल्-उदेद’ हवाई तळावरून अमेरिकेच्या कर्मचार्यांना बाहेरही काढण्यात आले होते.
सौदी अरेबिया, कतार आणि ओमान यांचा हस्तक्षेप !
यामुळे सौदी अरेबिया, कतार आणि ओमान यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. तिन्ही देशांच्या प्रशासकीय अधिकार्यांनी १५ जानेवारीला दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांना काही गोष्टी पटवून देण्यासाठी तिन्ही देशांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
आखाती देशांचा दबाव, तसेच ‘इराण आंदोलकांना फाशी देणार नाही’, या आश्वासनावरून ट्रम्प यांनी त्यांची भूमिका पालटली. इराणवरील आक्रमण संपूर्ण प्रदेशासाठी ‘विनाशकारी’ बनेल, असे ट्रम्प यांना सांगण्यात आले.
यासमवेतच आखातातील अमेरिकेच्या तळांवर इराणने आक्रमण केल्यास प्रादेशिक देशांशी असलेले त्याचे संबंध कायमचे खराब होतील, असा इशाराही इराणला देण्यात आला होता.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan