२९.९.२०२५ या दिवशी उत्तरप्रदेशातील साधकांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरुपदावर विराजमान झाल्याची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. ती पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत. १५.१.२०२६ या दिवशी या अनुभूतींमधील काही भाग आपण पाहिला. आज पुढील भाग पाहू.
भाग २
या लेखाचा भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/997906.html

७. श्रीमती सुनीता विश्वकर्मा, सैदपूर, उत्तरप्रदेश.
७ अ. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा साधेपणा आणि सहजता पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा अनुभवता येणे : ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची तीव्र तळमळ, साधनेचा ध्यास आणि त्याग हे सर्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहायला मिळाले. ‘आम्ही साधनेत किती अत्यल्प पडतो ?’, याचीही मला जाणीव झाली. सद्गुरु दादांनी साक्षीभावात राहून गुरुतत्त्वाशी एकरूप होऊन सेवेचे प्रयत्न केले. त्यांचा साधेपणा आणि सहजता पाहून मला गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) कृपा अनुभवता आली.
७ आ. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे मार्गदर्शन लाभल्यावर ‘साक्षात् ईश्वरालाच त्रास सांगत आहे’, असे वाटणे आणि त्यानंतर पुन्हा साधना चालू करणे : काही मासांपूर्वी जेव्हा मी मानसिक त्रासाशी लढत होते, तेव्हा २ वेळा माझ्या मनात सद्गुरु दादांना भेटायला हवे’, असे विचार आले आणि गुरुकृपेने मला त्यांचे मार्गदर्शनही लाभले. तेव्हा मला वाटले, ‘मी साक्षात् ईश्वरालाच माझे त्रास सांगत आहे.’ त्यानंतर माझे मन पुष्कळ हलके होऊन मी पुन्हा साधना आणि सेवा करणे चालू केले.’
८. श्री. वीरेंद्र वर्मा, नटवा, वाराणसी, उत्तरप्रदेश.
८ अ. सौ. क्षिप्रा जुवेकर प्रार्थना करतांना ‘प्रत्यक्ष श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळच मार्गदर्शन करत आहेत’, असे वाटणे : ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची ध्वनीचित्र-चकती जेव्हा आरंभ झाली, तेव्हा सौ. क्षिप्रा जुवेकर प्रार्थना करतांना ‘प्रत्यक्ष श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळच आहेत आणि ‘आम्हा सर्वांना भक्तीसत्संगाच्या रूपात साधनेची दिशा कशी असली पाहिजे, याचे मार्गदर्शन करत आहेत’, असे वाटत होते.
८ आ. ‘आम्ही ध्वनीचित्र-चकती पहात नसून प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळीच उपस्थित आहोत’, असे वाटत होते.
८ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांतून पिवळ्या प्रकाशरूपात ज्योत निघत होती आणि मधून मधून सुगंध येत होता.
८ ई. सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळाल्यामुळे अंतर्मुखता निर्माण होणे : पुष्कळ दिवसांपासून माझ्या मनात जे प्रश्न घोळत होते, ते ‘प्रतिमा जपणे’, या माझ्या अहंच्या पैलूमुळे कुणालाही विचारले नव्हते. आज मला त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळाली. त्यामुळे माझ्यामध्ये अंतर्मुखता निर्माण झाली. ‘मी साधनेत कुठे न्यून पडतो ? माझे कोणते स्वभावदोष प्रबळ झाले आहेत ?’, हे सर्व माझ्या लक्षात येऊ लागले. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता !’
सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यापासून कुटुंबीय आणि व्यवसायातील कर्मचारी यांच्यामध्ये पुष्कळ चांगले पालट होणे
‘माझ्या व्यवसायामुळे माझी इच्छा असूनही मी सेवेला म्हणावा तेवढा वेळ देऊ शकत नाही. जेव्हापासून मी सनातन संस्थेशी जोडलो आहे, तेव्हापासून माझे कुटुंबीय आणि माझे व्यवसायातील कर्मचारी यांच्यामध्ये पुष्कळ चांगले परिवर्तन झाले आहे. हे सर्व जण समंजसपणे आपापले दायित्व पार पाडत आहेत. मी गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कृतज्ञ आहे. ‘गुरुदेव, हे सर्वकाही केवळ आपल्या प्रेरणेने झाले आहे.’
– डॉ. अजय जैस्वाल, वाराणसी, उत्तरप्रदेश. (२९.९.२०२५)
९. श्री. मिथिलेश वर्मा, वाराणसी, उत्तरप्रदेश.
९ अ. सद्गुरु नीलेश सिंगबाळ ‘साधकांची उन्नती आणि त्यांची साधना चांगली व्हावी’, यासाठी साधकांचे स्वभावदोष समजून घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्न करणे : ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ हे स्वभावाने अत्यंत सहज, साधे आणि शांत आहेत. कोणत्याही साधकाने प्रश्न विचारल्यावर सद्गुरु दादा त्याचे समाधान होईपर्यंत त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. ‘साधकांची उन्नती व्हावी आणि त्यांची साधना चांगली चालू रहावी’, यासाठी सद्गुरु दादा साधकांचे स्वभावदोष समजून घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्न करतात. सद्गुरु दादांच्या चरणी कृतज्ञता !’
१०. डॉ. अजय जैस्वाल, वाराणसी, उत्तरप्रदेश.
१० अ. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी आत्मीयतेने सर्वांच्या साधनेविषयी विचारपूस करणे : ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे व्यक्तीत्व सरळ स्वभावाचे आहे. जेव्हा मी त्यांना भेटतो, तेव्हा ते अत्यंत अात्मीयतेने साधनेच्या संदर्भात माझी आणि माझ्या कुटुंबियांची आवर्जून विचारपूस करतात.
११. श्री. चंद्रशेखर सिंह, वाराणसी, उत्तरप्रदेश.
११ अ. कार्यक्रम पहाण्यासाठी बसताच अनाहतचक्र जागृत झाल्याचे जाणवणे : ‘ध्वनीचित्र-चकती पहाण्यासाठी मी आश्रमात येताक्षणीच मला पुष्कळ चांगले वाटत होते. मला संपूर्ण कार्यक्रमात आनंद जाणवत होता आणि कार्यक्रम पहाण्यासाठी बसताच ‘माझे अनाहतचक्र जागृत झाले आहे’, असे मला जाणवले. माझी मधून मधून भावजागृती होत होती.
१२. सौ. सानिका संजय सिंह, वाराणसी आश्रम, उत्तरप्रदेश.
१२ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका आणि सद्गुरु नीलेशदादा या सर्वांचा एकमेकांप्रती असलेला अत्युच्च कोटीचा भाव पहायची संधी मिळणे : ‘ध्वनीचित्र-चकती पहातांना संपूर्ण वेळ माझी भावजागृती होत होती. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु पिंगळेकाका आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ या सर्वांचा एकमेकांप्रती असलेला अत्युच्च कोटीचा भाव आम्हाला प्रत्यक्ष या नेत्रांनी पहाण्याची संधी गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) दिली आहे. त्यासाठी ‘आम्ही किती भाग्यवान आहोत’, या विचाराने गुरुदेवांच्या चरणी अखंड कृतज्ञता व्यक्त होत होती.
१२ आ. आश्रम, साधक आणि सेवा यांच्याविषयी सांगतांना सद्गुरु दादांचे शब्द एखाद्या प्रवाहासारखे अखंड निघणे आणि त्यांची एकरूपता अनुभवता येणे : ‘आश्रम, साधक आणि सेवा यांच्याप्रती सद्गुरु दादांच्या मनात केवढी कृतज्ञता आहे’, याविषयी सांगतांना सद्गुरु दादांचे शब्द एखाद्या प्रवाहासारखे अखंड निघत होते. सद्गुरु दादांची किती एकरूपता आहे ! ‘सद्गुरु नीलेशदादा वाराणसी आश्रमात रहात आहेत’, हे आमचे परम भाग्य आहे.
‘आम्हा सर्व साधकांना आध्यात्मिक स्तरावर त्यांच्या अस्तित्वाचा लाभ होऊ दे आणि त्या दिशेने आमचे प्रयत्न होऊ दे’, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !’
१३. श्री. राकेश कुमार, दानापूर, पटना, बिहार.
अ. ‘ध्वनीचित्र-चकती पहातांना मला वाटले, ‘जणू मी त्रेतायुगात आलो आहे आणि प्रभु श्रीरामाचा राज्याभिषेक होत आहे’, असे अनुभवता येत होते. त्या वेळी माझ्या शरिरातील ऊर्जेमध्ये पालट होत होता. मनातील सर्व विचार नष्ट होऊन मन निर्विचार झाले आणि शरिरात सकारात्मक ऊर्जा अनुभवली.’
(समाप्त)
(सर्व सूत्रांचा दिनांक २१.९.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!