वर्ष २०२१ मध्ये देवद, पनवेल येथील सनातन आश्रमातील बालसाधकांशी खेळतांना त्यांना आमच्या लहानपणीचे ‘मामाच्या गावाला जाऊया…’ हे मराठी गाणे शिकवायचे ठरवले. त्यानुसार ते गाणे मला तरी नीट आठवते का ?, हे बघण्यासाठी मी गुणगुणत होते. तेव्हा माझ्याकडून ‘मामाच्या गावाला जाऊया’ या ओळीत ‘मामाच्या’ हा शब्द न येता ‘रामाच्या’ असे येऊन ‘रामाच्या गावाला जाऊया’, असे गीत गायले जाऊ लागले. सध्याच्या काळात लहान कुटुंबामुळे लहान मुलांवर संस्कार करणे मोठे अवघड झाले आहे. तसेच सध्या बहुसंख्य मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते आणि इंग्रजी बालगीते शिकवली जातात. पूर्वी मराठीत काही सुंदर बालगीते होती; परंतु अलीकडच्या काळात तशी सोपी, सहज आणि सुंदर बालगीते निर्माण झालेली आढळत नाहीत. सध्याच्या काळाच्या पार्श्वभूमीवर देवाने सुचवलेले पुढील बालगीत मुलांना शिकवू शकतो, असे वाटले.

टप टप टप टप घोडागाडी,
टापांचा नाद रोमांचकारी ।
वार्यासंगे गाऊया,
रामाच्या गावाला जाऊया ।। १ ।।
अयोध्या सुंदर,
मनुनिर्मित ही नगरी ।
चला तिला सजवूया,
रामाच्या गावाला जाऊया ।। २ ।।

श्रीराम मोठा शूरवीर,
अनेक लक्ष्य एक तीर ।
चला क्षात्रवीर बनूया,
रामाच्या गावाला जाऊया ।। ३ ।।
सीता मोठी सुगरण,
बनवी नित्य नवे पक्वान्न ।
चला राजभोग सेवूया,
रामाच्या गावाला जाऊया ।। ४ ।।
रामाचा दास हनुमंत,
रामचरणी तो शरणागत ।
चला दास्यभाव शिकूया,
रामाच्या गावाला जाऊया ।। ५ ।।
रामाचा लाडका लक्ष्मण,
सेवेसाठी सदा सावध ।
चला सेवाभावात राहूया,
रामाच्या गावाला जाऊया ।। ६ ।।
रामाचा अनुगामी (टीप १) भरत,
धर्मस्वरूप तो मूर्तीमंत ।
धर्मतेजात न्हावूया,
रामाच्या गावाला जाऊया ।। ७ ।।
रामाचा अनुज (टीप २) शत्रुघ्न,
क्षात्रतेजाने परिपूर्ण ।
चला क्षात्रतेज जागवूया,
रामाच्या गावाला जाऊया ।। ८ ।।
रामाची प्रजा धर्माचरणी,
सदा धर्मरत सारे प्राणी ।
धर्माचरणात रमूया,
रामाच्या गावाला जाऊया ।। ९ ।।
रामराज्याचे अधिष्ठान,
धर्म असे हा सनातन ।
धर्मरक्षण्या धावूया,
रमाच्या गावाला जाऊया ।। १० ।।
सकल भूवरी रामराज्य,
इथे नांदतो वैदिक धर्म ।
चला वेदघोष गर्जूया,
रामाच्या गावाला जाऊया ।। ११ ।।
असे रामरूपी अवतार,
लाभले परात्पर गुरु (टीप ३) थोर ।
सदैव त्यांना वंदूया,
रामाच्या गावाला जाऊया ।। १२ ।।
असे रामराज्य आदर्श,
धरतीवरील हा स्वर्ग ।
सनातन आश्रमी पाहूया,
रामाच्या गावाला जाऊया ।। १३ ।।
परात्पर गुरूंचा संकल्प,
झाला असे कार्यरत ।
चला शिवधनुष्य उचलूया,
रामाच्या गावाला जाऊया ।। १४ ।।
रामराज्याचे पाईक आम्ही,
सांगे सनातन आणि समिती (टीप ४) ।
पुन्हा रामराज्य स्थापूया,
रामाच्या गावाला जाऊया ।। १५ ।।
रामाचे गाव वसे अंतरी,
अष्टांग साधनेची वाढवूनी गती ।
आत्मारामाला आळवूया,
रामाच्या गावाला जाऊया ।। १६ ।।
टीप १ – अनुयायी, भक्त
टीप २ – लहान भाऊ
टीप ३ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
टीप ४ – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती
– श्रीमती कमलिनी कुंडले (वय ६७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(वर्ष २०२३)
|
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !