
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/997111.html
२. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व !
२ आ. ईश्वरामध्ये कोणतेही स्वभावदोष नसल्याने ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया’ साधकाला ‘ईश्वराशी एकरूप होणे’ हे साधनेचे ध्येय गाठण्यास साहाय्य करते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आपण ईश्वर, त्याचे गुणधर्म आणि तो सत् (अंतिम सत्य) आहे, याविषयी जाणून घेतले. तुमच्या मते ‘सत् म्हणजे काय ?’ त्याचा अर्थ तुम्ही कसा लावता ? दगड सहस्रो वर्षांपर्यंत अविनाशी रहातो. ईश्वर तसा नाही, तरीही तो परम सत्य आहे. ईश्वर चैतन्य आणि आनंद यांनी परिपूर्ण आहे. सत्, चित् आणि आनंद हे त्याचे ३ गुणधर्म आहेत. ईश्वर म्हणजे परम सत्य आणि जगातील सर्व ज्ञान ! हे खरे ज्ञान नेहमी दैवी ऊर्जा आणि आनंद यांनी भरलेले असते. ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. ‘आपण ही वैशिष्ट्ये कशी आत्मसात् करू शकतो ?’, हे जाणून घेण्यासाठीच साधना करायची असते. साधना करून ईश्वराची ही वैशिष्ट्ये आपण आपल्यात आणू शकतो. आपल्याला ईश्वराशी एकरूप व्हायचे आहे. त्यासाठी एक उदाहरण पाहू. पाण्याच्या एका थेंबाला सर्वव्यापी व्हायचे आहे, तर त्याने काय करायला हवे ? त्याला केवळ समुद्रामध्ये मिसळून जावे लागेल. तेव्हाच तो समुद्राचा भाग बनेल. त्याचप्रमाणे आपण स्वतः ईश्वराशी एकरूप झालो, तर आपल्यालाही त्याच्यासारखे बनावे लागेल.
आपण ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेला इतके महत्त्व का देतो ?’, याचे मुख्य कारण म्हणजे ईश्वरामध्ये एकही स्वभावदोष नाही, त्याला कसलाच अहंकारही नाही. त्यामुळे जर तुमच्यात ‘मला काहीतरी ठाऊक आहे’, असा अहंकार असेल, तर तुम्ही ईश्वराशी एकरूप कसे होणार ?
३. अध्यात्मप्रसार करण्याची पूर्वसिद्धता
३ अ. समाजात जाऊन अध्यात्मप्रसार करणार्या साधकाची आध्यात्मिक पातळी किमान ५० टक्के असायला हवी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : जेव्हा तुम्ही इतरांना अध्यात्म शिकवण्यास आरंभ करता, तेव्हा तुमच्या मनात ‘मी शिकवत आहे’, असा विचार यायला नको. असा विचार आल्यास तुमच्यात अहंकार वाढू लागतो. त्यामुळे तुमच्या मनात हाच विचार दृढ असायला हवा की, ‘ईश्वरच माझ्या माध्यमातून बोलत आहे आणि मी केवळ एक माध्यम आहे.’ अन्यथा अध्यात्मातील बहुतांश तथाकथित मार्गदर्शकांचा अहं वाढतो आणि त्यांची अध्यात्मात अधोगती होते. शिष्यही त्यांचे अनुकरण करतात आणि तेसुद्धा अहंकाराने ‘मी अध्यात्म शिकवतो’, असे सांगू लागतात. हे सूत्र लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच जोपर्यंत तुम्ही स्वतः साधना करत नाही, तोपर्यंत तुमच्या शब्दांमध्ये चैतन्य येत नाही. हे चैतन्य असल्याविना लोकांवर तुमचा योग्य प्रभाव पडणार नाही आणि त्यांना तुम्ही आध्यात्मिक मार्गावर आणू शकत नाही. त्यामुळे स्वतः साधना करणे आवश्यक आहे. इतरांना अध्यात्म शिकवणे, म्हणजे ‘केवळ कागदावरील सूत्रे सांगणे’, असे नाही. तसे केल्यास तुम्ही महाविद्यालयातील प्राध्यापक अथवा शाळेतील शिक्षक यांच्यासारखेच एक व्हाल. अध्यात्मात तसे नसते. तुम्ही जे बोलता, त्यात चैतन्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमचा आध्यात्मिक स्तर आरंभी किमान ५० टक्के किंवा त्याहून अधिक असायला हवा, तरच तुमच्या बोलण्यात चैतन्य येईल. त्यानंतरच तुम्ही इतरांना अध्यात्माविषयी सांगू शकाल. असे असले, तरी इतरांना अध्यात्म शिकवतांना ‘माझा अहंकार वाढत नाही ना ?’, याची जाणीव तुम्हाला सतत जागृत ठेवावी लागते.
३ आ. ‘आपत्काळात कसे टिकून रहावे ?’, याबद्दल लोकांना मार्गदर्शन करणारे ग्रंथ प्रकाशित करणे, हे सध्याचे प्राधान्य आहे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : जवळजवळ साडेचार सहस्र ग्रंथ प्रकाशित होतील, एवढे लिखाण टंकलेखन करून सिद्ध आहे. अध्यात्मावरील ग्रंथांचे संकलन करण्याचे आता आम्ही थांबवले आहे. इतर विषयांवर लक्ष केंद्रित करत आहोत, उदा. तिसर्या महायुद्धाच्या वेळी कोणतेही आधुनिक वैद्य किंवा औषधे उपलब्ध नसतील, तेव्हा लोक ‘स्वतःवर उपचार कसे करू शकतील ?’, अशा आपत्काळात उपयुक्त ठरणार्या ग्रंथांची एक मोठी शृंखला सिद्ध होईल.
किमान युद्धाचे दुःख किंवा जी काही संकटे असतील, त्यांतून जगातील संपूर्ण मानवजातीचे रक्षण व्हायला हवे. त्यामुळे आपत्कालीन ग्रंथ प्रकाशित करणे, हे आता प्राधान्य आहे. हे साडेचार सहस्र ग्रंथ ईश्वरी राज्यात प्रकाशित केले जातील. ‘संपूर्ण मानवजातीला साहाय्य करणे’, हेच सध्या प्राधान्य आहे.
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/997701.html
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!