
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/997394.html
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आध्यात्मिक प्रवास
४ अ. रुग्णांना बरे करण्यासाठी वैद्यकीय शास्त्राच्या मर्यादा लक्षात येणे, विविध संतांकडे जाऊन अध्यात्माविषयी मार्गदर्शन घेऊन स्वतः साधनेला आरंभ करणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मी माझ्या आयुष्याबद्दल थोडे सांगतो. आरंभी मी पदव्युत्तर स्तरावर, म्हणजे शारीरिक स्तरावर शिक्षण घेत होतो. मला ‘एम्.डी. मेडिसिन’ व्हायचे होते. मग माझ्या लक्षात आले की, देहाला मर्यादा आहेत. मन अधिक महत्त्वाचे आहे. पुढच्या जन्मात आपण तेच मन घेऊन जातो. त्यामुळे मी मानसोपचारतज्ञ बनायचे ठरवले आणि त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. मग मला समजले की, मानसोपचारतज्ञ रुग्णाच्या केवळ बाह्यमनापर्यंत पोचू शकतात, त्याच्या अंतर्मनापर्यंत नाही. ‘रुग्णाच्या अंतर्मनापर्यंत कसे जायचे आणि त्याला कसे समजून घ्यायचे ?’, यासाठी मी संमोहन उपचार पद्धत विकसित केली. संमोहन उपचार पद्धतीने ‘रुग्णाच्या अंतर्मनामध्ये काय आहे ?’, हे मला समजेल; परंतु त्यामागचे कारण मला कसे कळणार, म्हणजे रुग्णाला होत असलेला त्रास त्याच्या प्रारब्धामुळे होत आहे कि वाईट शक्तींच्या त्रासामुळे होत आहे ? कारण कोणत्याही वैद्यकीय पुस्तकांत प्रारब्ध, वाईट शक्ती यांबद्दल लिहिलेले नाही. हे शब्द त्यांना ठाऊकही नाहीत. मग मी अध्यात्मशास्त्राचे ज्ञान घेण्यासाठी विविध संतांकडे गेलो. तेव्हा एका संतांनी मला सांगितले, ‘‘हे तुमचे गुरु (प.पू. भक्तराज महाराज) आहेत. त्यांच्याकडे जा.’’ त्यांनी मला तिथे नेले. मी माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या समवेत होतो. मी त्यांच्याकडे जात असे, तिथे रहात असे आणि तेथील सर्व सेवा करत असे.
४ आ. प.पू. भक्तराज महाराज यांनी अध्यात्माचा प्रसार करण्यास सांगून समष्टी साधना करून घेणे : एकदा प.पू. भक्तराज महाराज मला म्हणाले, ‘‘माझ्याकडे येऊ नकोस. लोकांना अध्यात्म शिकव.’’ त्यांनी माझ्या मनातील अडथळा दूर केला; अन्यथा मी केवळ व्यष्टी साधनाच करत राहिलो असतो. मी केवळ माझी (वैयक्तिक) आध्यात्मिक प्रगती होण्यासाठीच प्रयत्न करत होतो. मला अध्यात्म प्रसाराबद्दल ठाऊक नव्हते. त्यामुळे मी अध्यात्मप्रसार करण्यासाठी बाहेर जाऊ लागलो. मी एकतर बाहेर असायचो किंवा माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या समवेत असायचो. त्यांनी माझा वैद्यकीय व्यवसाय बंद करायला लावला. माझ्याकडे जी काही पैशांची बचत होती, ती ३ – ४ वर्षांत संपली आणि माझ्याकडे पैसेच उरले नाहीत, तरीही प.पू. भक्तराज महाराज मला प्रवास करायला सांगायचे, ‘सर्वत्र जा आणि अध्यात्मप्रसार करा.’ एक वेळ अशी आली की, माझ्याकडे गाडीत पेट्रोल भरण्यासाठीही पैसे नव्हते. मग प्रवास कसा करायचा ? तेव्हा प.पू. भक्तराज महाराज मला म्हणाले, ‘‘ही समस्या आहे का ? ठीक आहे !’’ मग त्यांनी मला पैसे दिले. साधनेत शिष्य गुरूंना धन अर्पण करतो. इथे गुरूंनी मला धन दिले. काही कालावधीनंतर माझी चारचाकी गाडी जुनी झाली. ती दुरुस्त होऊ शकत नव्हती. मी प.पू. भक्तराज महाराज यांना सांगितले, ‘‘गाडी नादुरुस्त झाली आहे. आता मी बाहेर जाऊ शकत नाही.’’ ते म्हणाले, ‘‘ही गाडीची चावी घ्या.’’ त्यांनी मला त्यांच्या गाडीची चावी दिली. सध्या ती गाडी येथे आहे.
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/997943.html
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !