|

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिका भारताला व्हेनेझुएलामधून तेल खरेदी करण्याची अनुमती देऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. अमेरिकी सरकारमधील एका वरिष्ठ अधिकार्याने ही माहिती दिल्याचे जागतिक वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’ने दिली. साधारण मे २०२५ मध्ये अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील निर्बंधांनंतर भारताने त्याच्याशी तेल व्यापार थांबवला होता. आता नव्याने तेल व्यापार चालू होणार असला, तरी तो अमेरिकेच्या अटींवर आधारित असणार आहे. ‘भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी. असे केल्यावर व्हेनेझुएलाच्या तेलासहित भारतावर लादलेले २५ टक्के अतिरिक्त आयात करही रहित होऊ शकतो’, असे म्हटले जात आहे. भारतीय आस्थापन ‘रिलायन्स’ला हा व्यापार करण्याची इच्छा आहे, अशी माहितीही समोर आली आहे.
भारत जगातील तिसरा सर्वांत मोठा तेल आयातकर्ता देश, तर व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वाधिक तेल साठा !
१. ट्रम्प यांनी ९ जानेवारीला ‘व्हाईट हाऊस’मध्ये (अमेरिकेच्या अध्यक्षांचे कार्यालय तथा निवासस्थान) जगातील मोठ्या तेल आस्थापनांच्या वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेतली. व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रात अनुमाने ९ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे ट्रम्प यांनी या वेळी उघड केले.
२. व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वांत मोठा तेलसाठा असून तो जागतिक पुरवठ्याच्या केवळ १ टक्के तेल पुरवत आला आहे.
३. अमेरिकेने वर्ष २०१९ मध्ये व्हेनेझुएलावर कठोर आर्थिक निर्बंध लादले होते. पुढे त्याने जे देश त्याच्याकडून तेल खरेदी करतील, त्यांना अमेरिकी बाजारात व्यापार करण्यापासून किंवा बँकिंग सुविधांपासून रोखले जाऊ शकते, असे नियमही लादले. त्या वेळी भारत त्याच्या एकूण तेल आयातीपैकी ६ टक्के तेल एकट्या व्हेनेझुएलाकडून आयात करत होता.
४. मधल्या काळात अमेरिकेने व्हेनेझुएलावरील निर्बंध अंशतः शिथील केले होते. तथापि मे २०२५ मध्ये तिने पुन्हा एकदा व्हेनेझुएलाच्या तेलावरील निर्बंध अधिक कठोर केले.
संपादकीय भूमिकायाला म्हणतात हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणे ! (स्वतःचे नसलेल्या गोष्टीचा किंवा दुसर्याच्या मालकीच्या वस्तूचा त्याग करणे, दान देणे किंवा दुसर्याला देणे) दादागिरी करून व्हेनेझुएलावर नियंत्रण मिळवून त्याचे तेल अन्य देशांना विकण्याचा अधिकार अमेरिकाला कुणी दिला ? आणि असे तेल अन्य देशांनी का म्हणून विकत घ्यावे ? भारताला असे तेल विकतांनाही अमेरिका अटी ठेवतो, यावरून त्याचा उन्मत्तपणा किती आहे, हे लक्षात घ्या ! |
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले