पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे दिवास्वप्न !

इस्लामाबाद (पाकिस्तान) : अमेरिकेने जसे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना त्यांच्या देशात घुसून पकडून आणले, तसे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनाही पकडले पाहिजे, अशी मागणी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली.
ख्वाजा आसिफ पुढे म्हटले की,
तुर्कीयेही नेतान्याहू यांना पकडू शकतो आणि पाकिस्तानी यासाठी प्रार्थना करत आहेत. नेतान्याहू मानवतेचे सर्वांत मोठे गुन्हेगार आहेत. गाझामध्ये पॅलेस्टिनींवर जे अत्याचार झाले आहेत, ते इतिहासात कधीही पाहिले गेले नाहीत.
Shocking: Pak defence minister urges Turkey to abduct @IsraeliPM @netanyahu on live TV show. He also hints at 'punishing' those behind Netanyahu (Trump) before getting off air by news anchor.pic.twitter.com/KOg70n8oJL
— Pakistan Untold (@pakistan_untold) January 8, 2026
या मुलाखतीच्या वेळी आसिफ यांनी ‘अशा गुन्हेगारांना साथ देणार्या लोकांबद्दल कायदा काय म्हणतो ?’ असे म्हटल्यावर मुलाखत घेणारे पत्रकार हमीद मीर यांनी मध्येच थांबवून विचारले की, ‘तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात बोलत आहात का ?’ यानंतर मीर यांनी मुलाखत मध्येच थांबवली.
संपादकीय भूमिकाजर पाकला असे वाटत असेल, तर भारतानेही पाकमध्ये घुसून भारतावर आतंकवादी आक्रमणे करणार्या प्रमुख आतंकवाद्यांसह पाकचे सैन्यदलप्रमुख आसीम मुनीर, पंतप्रधान शाहबाज शरीफ आदींनाही पकडून आणले पाहिजे, अशी मागणी भारतियांनी केली पाहिजे ! |
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman