अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांचा दावा

वॉशिंग्टन (अमेरिका) : भारत-अमेरिका व्यापार करार कोणत्याही धोरणात्मक मतभेदांमुळे नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांना भ्रमणभाष न केल्यामुळे रखडला, असा दावा अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी एका मुलाखतीत केला. यामुळे ट्रम्प यांचा अहंकार दुखावल्याचेही त्यांनी सांगितले.
So Howard Lutnick claims the India-U.S. trade deal stalled because Narendra Modi didn’t call Donald Trump.
Does Washington really believe India must flatter Trump to avoid arbitrary 50% tariffs?
India is a sovereign nation, not a vassal state.
Given Trump’s erratic,… pic.twitter.com/LzdorIcsdg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 9, 2026
लुटनिक पुढे म्हणाले की,
१. दोन्ही देशांतील व्यापार करार जवळपास अंतिम टप्प्यात होता. चर्चा पूर्ण करण्यासाठी भारताला ‘तीन शुक्रवारां’ची समयमर्यादा देण्यात आली होती. ट्रम्प स्वतः तो अंतिम करू इच्छित होते; परंतु नरेंद्र मोदी यांनी त्यांना थेट भ्रमणभाष न केल्याने करार पुढे जाऊ शकला नाही.
२. परिणामी अमेरिकेने इंडोनेशिया, फिलिपाइन्स आणि व्हिएतनाम यांच्यासमवेत व्यापार करार केला. याउलट ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी ट्रम्प यांना भ्रमणभाष केल्यानंतर लगेच अमेरिका आणि ब्रिटन यांच्यात करार झाला.
३. भारतासाठी याआधी ठरलेल्या अटी आता लागू नसतील. भविष्यात जर दोन्ही देशांमध्ये करार झालाच, तर भारताला नव्या आणि कठीण अटींचा सामना करावा लागू शकतो.
रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने भारतावर एकूण ५० टक्के शुल्क लादले आहे. भारताने हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत शुल्क तातडीने रहित करण्याची मागणी केली आहे. याविषयावर दोन्ही देशांत चर्चा चालू असल्या, तरी व्यापार करार अद्याप प्रलंबित आहे.
संपादकीय भूमिकाट्रम्प त्यांना वाटेल तेव्हा भारतावर ५० टक्के आयात शुल्क लादणार आणि भारताने त्यांची मर्जी राखण्यासाठी त्यांचे तळवे चाटायचे, असे लुटनिक यांना वाटते का ? ट्रम्प यांचा विक्षिप्त स्वभाव पहाता या कराराच्या प्रकरणी भारताने हुशारीने पावले टाकण्याची आवश्यकता आहे ! |
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !