हरिद्वार (उत्तराखंड) – कुंभपर्वापूर्वी हरिद्वारमधील ‘हर की पौडी’ या घाटावर आता अहिंदूंची तपासणी चालू झाली आहे. येथे प्रत्येकाचे आधार कार्ड तपासले जात आहे आणि कुणी अहिंदू या परिसरात व्यवसाय करत नाही ना ?, याचीही चौकशी केली जात आहे.
Aadhaar Checks at Haridwar Ghats Ahead of Kumbh Mela
📍 Haridwar | Har Ki Pauri
Key Points
• Aadhaar verification begins at ghats to prevent non-Hindus from doing business before Kumbh Mela• Teerth Purohits & sadhus say the step is needed to protect devotees’ faith and… https://t.co/lDXex9E9Pt pic.twitter.com/k0dC90fLMj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 9, 2026
१. घाटांवर उपस्थित असलेल्या तीर्थ पुरोहितांचे आणि साधू-संतांचे म्हणणे आहे की, हे कठोर निर्णय घेणे आवश्यक आहेत. काही लोक पैसे कमावण्याच्या नावाखाली भाविकांच्या श्रद्धेला धक्का पोचवणारी कामे करत होते, ज्यामुळे वाद आणि भांडण यांची परिस्थिती निर्माण होत होती.
२. संतांचे म्हणणे आहे की, कुंभपर्व हा अत्यंत पवित्र सोहळा असून हरिद्वार हे देवभूमीचे प्रवेशद्वार आहे, त्यामुळे अहिंदूंना कुंभस्थळ आणि घाट परिसर येथे प्रवेश पूर्णपणे प्रतिबंधित असावा.
३. या मागणीला मुसलमान संघटना आणि समाजातील लोक यांचा विरोधही तितकाच तीव्र आहे. त्यांचे म्हणणे आहे की, घाटांवर प्रवेश रोखण्याचा आणि ओळखीच्या आधारावर तपासणी करण्याचा प्रयत्न संकुचित विचारसरणी दर्शवतो. यामुळे आपापसांतील बंधुत्वाला हानी पोचेल.
४. तीर्थ पुरोहित उज्ज्वल पंडित यांचे म्हणणे आहे की, सर्वांना आधार कार्ड समवेत ठेवण्यास सांगितले आहे. जर कोणताही अहिंदू हर की पौडी किंवा घाट परिसरात व्यवसाय करतांना आढळल्यास, त्याची माहिती ‘श्री गंगा सभे’ला दिली जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल. घाटांची पवित्रता राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
५. ‘श्री गंगा सभे’चे म्हणणे आहे की, आम्ही कुठलाही नवीन नियम बनवण्यास सांगितलेला नाही, तर अनुमाने ११० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या नियमांची कार्यवाही करण्याची मागणी करत आहेत.
६. महामंडलेश्वर स्वामी रूपेंद्र प्रकाश महाराज यांनी सांगितले की, कुंभपर्व ४ पवित्र ठिकाणी भरतो आणि हरिद्वार हे देवभूमीचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे अहिंदूंना कुंभ आणि घाट परिसरात प्रवेश करण्याची अनुमती देऊ नये. जर एखादा भाविक श्रद्धेने येत असेल, तर तो वेगळा विषय आहे; परंतु श्रद्धेशी खेळणार्यांच्या प्रवेशावर बंदी घालणे आवश्यक आहे.
आखाड परिषदेचा विरोध !
आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांचे म्हणणे आहे की, हरिद्वार नगरपालिका कायद्यात ब्रिटिशांच्या काळापासून काही तरतुदी आहेत; परंतु सध्याची कायदेशीर स्थिती पालटली आहे. महानगरपालिका झाल्यानंतर ज्वालापूरसारख्या क्षेत्रांमध्ये मुसलमान समुदाय मोठ्या संख्येने रहातो, अशा परिस्थितीत संपूर्ण हरिद्वार किंवा संपूर्ण कुंभपर्व क्षेत्रात अशी मागणी व्यावहारिक मानली जाऊ शकत नाही. जर सरकार या मागणीवर विचार करत असेल आणि हरिद्वारच्या योग्य शहरात किंवा काही मर्यादित क्षेत्रांपर्यंत ते लागू करत असेल, तर हे स्वागतार्ह असू शकते. तथापि कुंभपर्व क्षेत्र, जे ३ जिल्ह्यांपर्यंत पसरलेले असते, तेथे अशा प्रकारची बंदी योग्य ठरणार नाही.
खरे संत कोणत्याही धर्माच्या विरोधात बोलत नाहीत ! – ए.आय.एम्.आय.एम्.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (ए.आय.एम्.आय.एम्.) प्रदेशाध्यक्ष नय्यर काझमी म्हणाले की, खरे संत किंवा महात्मा कधीही कोणत्याही धर्माच्या विरोधात बोलत नाही. (मुसलमानांमध्ये असे एकतरी खरे संत आणि महात्मा आहेत का ? – संपादक) ऋषि-मुनींच्या नावाचा आधार घेऊन अशा गोष्टी केल्या जात आहेत, ज्या समाजाला विभाजित करण्याचे काम करतात. (हिंदू कधीही विभाजनाचे विचार मांडत नाहीत. भारताचे विभाजन मुसलमानांमुळे झाल्यानंतरही मुसलमान पाकिस्तानात गेले नाहीत आणि परत भारताचे दुसरे विभाजन करण्याच्या स्थितीपर्यंत ते पोचले आहेत, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक) सध्या राज्य अनेक मोठ्या समस्यांमधून जात आहे. (मजार (मुसलमानाचे थडगे) जिहाद, लव्ह जिहाद आदी समस्या उत्तराखंडमध्ये वाढल्या आहेत, हेच त्यांना सांगायचे आहे का ? – संपादक) युवकांच्या रोजगाराचे, महिलांच्या प्रश्नांचे आणि इतर प्रकरणांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारचे वाद निर्माण केले जात आहेत.

हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !