पोलिसांनी हुसकावूनही घटनास्थळाच्या परिसरातच घुटमळत राहिल्याने संशयाच्या भोवर्यात

नवी देहली : देहली महानगरपालिकेकडून ६ जानेवारीच्या रात्री फैज-ए-इलाही मशिदीजवळील अतिक्रमण काढले जात असतांना ‘मशीद पाडली जात आहे’, अशी अफवा पसरण्यात आली. त्या वेळी पोलिसांवर दगडफेक केल्याच्या प्रकरणी आता पोलीस समाजवादी पक्षाचे खासदार मोहिबुल्लाह नदवी यांची चौकशी करणार आहेत. या घटनेच्या वेळी पोलिसांनी नदवी यांना हुसकावून लावूनही ते घटनास्थळाच्या परिसरातच घुटमळत राहिल्याने पोलिसांचा त्यांच्यावर संशय आहे. या दगडफेकीच्या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाची पडताळणी केली असून त्याद्वारे ३० जणांना ओळखले आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची वेगवेगळी पथके अनेक भागांत धाड घालत आहेत.
SP MP Under Scanner in Delhi Violence 🚨
SP MP Mohibullah Nadwi is set to be questioned in the Delhi stone-pelting case.
🔹 Found lingering near the scene despite being moved away by police
🔹 Past incidents have often shown direct or indirect links of Radicalized leaders in… https://t.co/KOMka8F9Sy pic.twitter.com/EB751UTpiv
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 8, 2026
संपादकीय भूमिकाअशा हिंसाचारांत मुसलमान नेत्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असतो, हे यापूर्वी घडलेल्या अनेक घटनांत दिसून आले आहे. त्यामुळे या हिंसाचारात नदवी यांचा हात असल्याचे उघड झाल्यास आश्चर्य वाटू नये ! |
|

दगडफेकीच्या घटनेचे समर्थन करतांना समाजवादी पक्षाचे नेते एस्.टी. हसन म्हणाले की, येथे १०० वर्षांपूर्वीची मशीद आणि दुकाने आहेत. अतिक्रमणाच्या नावाखाली अत्याचार केला गेल्यास लोक किती काळ गप्प बसणार ? जर हीच कारवाई सर्वत्र केली गेली, तर लोकांनी संयम ठेवला असता. अशा गोष्टी लोकांच्या भावना आणि श्रद्धा यांच्याशी निगडित असल्याने त्यांच्या धार्मिक स्थळांविरुद्धच्या कुठल्याही क्रियेवर (‘ॲक्शन’वर) प्रतिक्रिया (रिॲक्शन) उमटणारच. अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली अत्याचार केला जात आहे. अतिक्रमण झाले असेल, तर संबंधित अधिकार्यांवर कारवाई व्हायला हवी.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारे हिंसेचे समर्थन करणार्यांनाही पोलिसांनी कारागृहात टाकले पाहिजे ! |
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !