
मुंबई – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ संघटना बजरंग दलाची तुलना आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी केल्यावरून माझगाव येथील न्यायिक दंडाधिकारी (प्रथम वर्ग) न्यायालयाने काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. याविषयीचा चौकशी अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे नेते यांना आरोपी करण्यात आले आहे.
वर्ष २०२३ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत बजरंग दलाची तुलना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या आतंकवादी संघटनेशी केली होती. काँग्रेस सत्तेत आल्यावर बजरंग दलावर बंदी घालण्यात येईल, असेही काँग्रेसने वचनमान्यात नमूद केले होते. या प्रकरणी श्री. वशिष्ट चौधरी यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. चौधरी यांच्या वतीने अधिवक्ता संतोष दुबे हा खटला लढवत आहेत. या प्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांसह काँग्रेस पक्षाचीही चौकशी करण्यात येणार आहे.
लाखो राष्ट्रप्रेमींच्या भावना दुखावणारे वक्तव्य ! – तक्रारदार
बजरंग दल ही देशपातळीवरील सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी संघटना आहे. भारत सरकारने बजरंग दलाला प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित केलेले नाही, तसेच कोणत्याही संघटनेवर बंदी घालण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे, राज्यशासनाला नाही. असे असतांना बजरंग दलाची तुलना आतंकवादी संघटनेशी करून तिच्यावर बंदी घालण्याचे आश्वासन देणे, हे संघटनेची अपकीर्ती करणारे आहे. राष्ट्रवादी संघटनेची तुलना आतंकवादी संघटनेशी केल्यामुळे लाखो राष्ट्रप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत, अशी भूमिका तक्रारदार वशिष्ट चौधरी यांच्या वतीने अधिवक्ता संतोष दुबे यांनी न्यायालयात मांडली.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)