सातारा येथे पार पडलेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या निमित्ताने…
राष्ट्रवादावाचून मराठी साहित्य संमेलन, म्हणजे अमावास्येला कोजागरी साजरी करणे !
प्रतिवर्षी मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रवादाला कुठेही स्थान नसल्याचे आढळून येत आहे. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘राष्ट्रविघातक विचारांना विरोध करण्यासाठी साहित्य संमेलनात चर्चासत्र नसणे आश्चर्यजनक, समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले पारतंत्र्याच्या दुःखाचे वर्णन, साम्यवादी अन् मुसलमान यांच्या विचारांच्या विरोधात लढण्यासाठी सावरकर यांचा राष्ट्रवाद उपयुक्त आणि धर्म विचारून गोळ्या घालणार्या जिहाद्यांच्या विरोधात विद्रोही साहित्यिकांकडून लेखन का नाही ?’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(भाग ४)
भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/993659.html

१२. छत्रपती शिवरायांनी परकीय आक्रमकांच्या विरोधात शस्त्र उपसले !
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या आक्रमणाला केवळ राजकीय आक्रमण मानले नाही, तर ते धार्मिक अन् सांस्कृतिकही मानले. ख्रिस्ती आणि मुसलमान या दोन्ही परकियांच्या आक्रमकांनी हिंदु धर्म अन् संस्कृती नष्ट करण्याचा चंग बांधला होता. म्हणून सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या रक्षणार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांनी हाती शस्त्र धारण केले होते. ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापनेचा अर्थच मुळी ‘हिंदु राष्ट्रवाद आणि हिंदु सांस्कृतिक राष्ट्रवाद यांची स्थापना’ असाच आहे. या राष्ट्रवादाचे महत्त्व उत्तर हिंदुस्थानातील छत्रपती शिवरायांच्या काळातील कवी भूषण यांनी काव्यातून अधोरेखित केले आहे.

राखी हिंदुवानी हिंदुवान को तिलक राख्यौ ।
अस्मृति पुराण राखे वेद धुन सुनी मै ॥
राखी रजपूती राजधानी राखी राजन की ।
धरा मैं धर्म राख्यौ ज्ञान गुन गुनी मैं ॥
भूषन सुकवि जीति हद्द मरहठ्ठन की ।
देस देस करत बखानी तव सुनी मैं ॥
साहि के सुपूत सिवराज शमशीर तेरी ।
दिल्ली दल दाबि के दिवाल राखी दुनी मैं ॥

भावार्थ : कवी भूषण म्हणतात, ‘शहाजीराजांचे सुपुत्र शिवाजी महाराज यांनी हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट होण्यापासून वाचवली, तसेच हिंदूंच्या माथ्यावरील कुंकुमतिलकाचे रक्षण केले. एवढेच नाही, तर हिंदु धर्माचे रक्षण करून वैदिक मर्यादांचे उल्लंघन होण्यापासून रक्षण केले, म्हणजेच स्मृतीपुराण आणि वेद यांचे रक्षण केले. क्षत्रियांचे क्षत्रियत्वही राखले. क्षत्रियांच्या राजधान्या सुरक्षित ठेवल्या. पृथ्वीवर धर्माची स्थापना केली आणि गृहिणींच्या गुणांचेही रक्षण केले.’ कवी भूषण म्हणतात की, छत्रपती शिवरायांनी मराठ्यांच्या अधिकार सीमांचेही रक्षण केले. अर्थात् त्यांच्या अधिकार सीमा रुंदावल्या. स्वतःची कीर्ती सर्वदूर पसरवली. मी असे ऐकले आहे की, शहाजीराजांचे सुपुत्र शिवराज यांनी त्यांच्या तलवारीच्या बळावर देहलीच्या सेनेचा पराभव केला. संपूर्ण विश्वात हिंदु राष्ट्र आणि हिंदूंच्या मर्यादेचे रक्षण केले.
१३. ‘मराठी साहित्य संमेलन, म्हणजे अमावास्येला साजरी केलेली कोजागरी’, असे म्हणण्यामागील कारण
‘छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुसलमान होते’, असा अपप्रचार करून त्यांचा हा धगधगता इतिहास आणि पराक्रम मातीमोल करण्याचे काम साम्यवादी आणि विद्रोही साहित्यिक यांनी केले. अशा दळभद्री विचारसरणीच्या साहित्यिकांकडून छत्रपती शिवरायांच्याच महाराष्ट्रात त्यांच्या हिंदु आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाला साहित्य संमेलनात कुठेही स्थान न देऊन त्यांचा घोर अवमान केला आहे. म्हणूनच सातार्यात होणारे ९९ वे मराठी साहित्य संमेलन, म्हणजे अमावास्येला साजरी केलेली कोजागरी आहे.
१४. हिंदु आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद, तसेच हिंदुस्थान राष्ट्र म्हणून टिकून रहाण्यासाठी…
मराठी साहित्य संमेलनाची सूत्रे ज्यांच्या हाती आहेत, ते राष्ट्र आणि संस्कृती निष्ठ नाहीत. संमेलनाला महाराष्ट्र शासनाकडून प्रतिवर्षी आर्थिक साहाय्य दिले जाते. महाराष्ट्र शासन जे आर्थिक साहाय्य करते, ते जनतेकडून कररूपात दिले गेलेले धन शासनाच्या गंगाजळीत जमा होत असते. त्या धनाचा अपव्यय टाळण्यासाठी शासनाने या गोष्टींकडे गांभीर्याने पाहून त्या विरोधात योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे, तसेच साहित्य परिषदेच्या सभासदांमध्ये राष्ट्र आणि संस्कृती निष्ठ खास करून तरुण-तरुणी सभासदांची संख्या वाढवणे, ही नितांत आवश्यक आहे; कारण पु.भा. भावे वर्ष १९७७ मध्ये मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते, त्यानंतर अनेक वर्षांनी हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, लेखक आणि प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे हे ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी ‘संमेलनाध्यक्ष’ होण्याच्या हेतूने त्यांनी विधीवत् आवेदन पत्र भरले होते; पण राष्ट्र आणि संस्कृती निष्ठ असलेले डॉ. शेवडे यांना संमेलनाचे अध्यक्षपद मिळू नये; म्हणून पूर्ण बंदोबस्त करण्यात आला होता.
साम्यवादी आणि विद्रोही साहित्यिक यांचा हा डावपेच लक्षात घेऊन वेळीच याकडे लक्ष देऊन योग्य ती पावले उचलली नाहीत, तर अनंत काळापासून या देशात रुजलेला हिंदु आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद या दोन्ही विचारसरणी नष्ट होतील अन् हिंदुस्थान हे राष्ट्र म्हणून जिवंत रहाणार नाही. परिणामी आपणच आपल्या नाकर्तेपणामुळे पापाचे धनी होऊ !
(समाप्त)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२८.१२.२०२५)
सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
‘सनातन क्रांती’ची नांदी !