|
(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा)

नवी देहली – बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांच्या संदर्भात देशातील प्रसिद्ध व्यक्तींनी स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. शांत रहाणे, हे चुकीचा संदेश देणारे ठरते. अभिनेते शाहरुख खान यांनी देशवासियांची क्षमा मागावी आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी स्पष्ट विधान करावे. अशा संवेदनशील काळात मौन धरणे योग्य नाही, असे आवाहन अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांनी केले. ‘इंडियन प्रीमियर लीग’ (आयपीएल्) क्रिकेट स्पर्धेमधील कोलकाता नाईट रायडर्स या शाहरुख खान यांची मालकी असलेल्या संघाने एका बांगलादेशी खेळाडूची निवड केली, यावरून इलियासी यांनी वरील आवाहन केले.
इलियासी यांनी नमूद केले की, आजचा बांगलादेश भारताच्या मोठ्या योगदानामुळे निर्माण झाला आहे. अशा देशात अल्पसंख्यांक हिंदूंवर आक्रमणे होणे अत्यंत दु:खद आणि निंदनीय आहे. परिस्थिती इतकी गंभीर असतांना त्या देशातील लोकांना भारतात येऊन क्रीडा किंवा इतर उपक्रम करण्याची अनुमती द्यावी का ?
🚨 Demand Raised Amid Bangladesh Violence 🇧🇩⚠️
Actor Shah Rukh Khan should apologize to the nation, demands Umar Ilyasi, head of the All India Imam Organization.
📌 The demand comes in the backdrop of violence in Bangladesh
🏏 Context: A Bangladeshi player Mustafizur Rahman… pic.twitter.com/TKuaP0Ph9R
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 2, 2026
इस्लामच्या नावाखाली हिंसा करण्याला विरोध !
इस्लामच्या नावाखाली हिंसा करणे, हे इस्लामच्या शिकवणीच्या विरोधात आहे, असे इलियासी यांनी ठामपणे सांगितले. निरपराधांवर अत्याचार करणे किंवा त्यांचे प्राण घेणे, हे धर्म कुठल्याही प्रकारे मान्य करत नाही. हा विषय केवळ धर्म किंवा राजकारण यांच्याशी संबंधित नसून देश अन् मानवता यांच्याशीही संबंधित आहे. सर्व समाजघटक आणि प्रभावी व्यक्ती यांनी एकत्र येऊन हिंसेविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे. यामुळे जगभरात योग्य संदेश जाईल.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक