|

रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियाने येमेनमधील मुकल्ला बंदरावर हवाई आक्रमण केल्याने संयुक्त अरब अमिरातने विरोध दर्शवला. यामुळे या देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. येमेनमध्ये सध्या अमिरातच्या सैन्याची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे. येमेनमधील बंडखोरांना शस्त्र आणि दारूगोळा पुरवण्यासाठी अमिरातने एक नौका मुकल्ला बंदरावर पाठवली, असा संशय सौदी अरेबियाला होता. त्यामुळे सौदी अरेबियाने या नौकेला लक्ष्य करण्यासाठी मुकल्ला बंदरावर आक्रमण केले. त्यानंतर अमिरातने त्याचे सैन्य येमेनमधून माघारी बोलावणार असल्याचे घोषित केले आहे. विशेष म्हणजे आक्रमणापूर्वीच सौदी अरेबियाने सैन्य माघारी बोलण्यासाठी अमिरातला २४ घंट्यांची मुदत दिली होती.
🌍🔥 Middle East Exposed
The United Arab Emirates has withdrawn its forces from anti-terror operations in Yemen, following the impact of recent attacks by Saudi Arabia.
⚠️ This has intensified tensions between Saudi Arabia & the UAE.
🕌 Fanatical Islamists dream of global… pic.twitter.com/r6EFTKTASj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 31, 2025
१. ‘येमेनमधील फुटीरतावादी संघटनांच्या साहाय्यासाठी शस्त्रे पाठवल्याने सौदी अरेबियाची सुरक्षितता धोक्यात आली होती. त्यामुळे देशाच्या संरक्षणासाठी आक्रमण केले’, असे सौदी अरेबियाने म्हटले आहे. अमिरातने सौदी अरेबियाने केलेला दावा फेटाळत म्हटले की, ही शस्त्रे तेथील अमितराच्या सैनिकांसाठी पाठवली होती.
२. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्यानंतर अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी मार्को रुबियो यांनी सौदी अरेबिया अमिरात यांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी दूरभाषवर चर्चा केली. कुवेत, बहरीन, कतार या देशांनीही चिंता व्यक्त केली आहे. या घटनेनंतर येमेनमध्ये आतंकवाद्यांच्या विरोधात चालू असलेली मोहीम संपवत असल्याचे संयुक्त अरब अमिरातने घोषित केले.
संपादकीय भूमिकाधर्मांध मुसलमानांना अख्ख्या जगात इस्लामचे राज्य आणायचे आहे; मात्र जगात जे इस्लामी देश आहेत, ते मात्र एकमेकांच्या कुरापती काढून लढतात. शांतीची शिकवण देणार्या इस्लामवाद्यांचे खरे स्वरूप आता जगासमोर येत आहे ! |
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan