ख्रिस्त्यांची हत्या थांबेपर्यंत कारवाई चालूच राहिल ! – ट्रम्प यांची चेतावणी

वॉशिंग्टन (अमेरिका) – ख्रिस्त्यांच्या होणार्या हत्यांच्या विरोधात अमेरिकेने २५ डिसेंबरच्या रात्री नायजेरियातील इस्लामिक स्टेटच्या तळांवर हवाई आक्रमण केले. याविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी चेतावणी देत म्हटले की, जर ख्रिस्त्यांच्या हत्या अशाच चालू राहिल्या, तर मृत आतंकवाद्यांच्या संख्येत अशाच प्रकारे भर पडत राहिल.
🇺🇸✈️ U.S. airstrikes hit Islamic State camps in Nigeria after killings of Christians.
🗣️ “They were warned earlier. This will continue until the killing of Christians stops.” – Donald Trump
🌍 Mock Trump’s tariff policies if you want; but striking terrorists thousands of km… pic.twitter.com/0fQJzbb4m7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 26, 2025
ट्रम्प यांनी म्हटले की,
माझ्या आदेशानुसार अमेरिकेने वायव्य नायजेरियातील इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांवर एक शक्तीशाली आणि प्राणघातक आक्रमण केले आहे. हे आतंकवादी अनेक वर्षे आणि शतकांपासून निष्पाप ख्रिस्त्यांना लक्ष्य करत होते आणि त्यांची क्रूरपणे हत्या करत होते. मी यापूर्वीच या आतंकवाद्यांना चेतावणी दिली होती की, जर त्यांनी ख्रिस्त्यांचे हत्याकांड थांबवले नाही, तर त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि आज रात्री तेच झाले. सैन्याने अत्यंत अचूक आक्रमणे केली, जी केवळ अमेरिकाच करू शकते. माझ्या नेतृत्वाखाली, आमचा देश कट्टरतावादी इस्लामी आतंकवादाला कधीही वाढू देणार नाही. ईश्वर आमच्या सैन्याला आशीर्वाद देवो आणि सर्वांना आणि मृत आतंकवाद्यांनाही मेरी ख्रिसमस !
अमेरिकी सैन्याच्या आफ्रिका कमांडने ‘एक्स’वर वर या कारवाईची अधिकृत माहिती देतांना सांगितले की, नायजेरियाच्या प्रशासनाच्या विनंतीवरून हे हवाई आक्रमण करण्यात आले आणि या कारवाईत इस्लामिक स्टेटचे अनेक आतंकवादी मारले गेले आहेत.
.@POTUS “Tonight, at my direction as Commander in Chief, the United States launched a powerful and deadly strike against ISIS Terrorist Scum in Northwest Nigeria, who have been targeting and viciously killing, primarily, innocent Christians, at levels not seen for many years, and… pic.twitter.com/ct7rUW128t
— Department of War 🇺🇸 (@DeptofWar) December 26, 2025
केवळ ख्रिस्त्यांवर आक्रमण होत नाही ! – नायजेरिया सरकार
नायजेरियन सरकारने म्हटले आहे की, सशस्त्र गट मुसलमान आणि ख्रिस्ती या दोघांनाही लक्ष्य करत आहेत. ट्रम्प यांचा ‘ख्रिस्त्यांना छळाला सामोरे जावे लागत आहे’, हा दावा गुंतागुंतीचा, सुरक्षेसंबंधी परिस्थिती न दाखवणारा आणि धार्मिक स्वतंत्र्याचे रक्षण करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करणारा आहे. असे असले, तरी आतंकवादी गटांविरुद्ध आमच्या सैन्याला अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही अमेरिकेसमवेत मिळून काम करण्याची सिद्धता दर्शवली आहे.
यापूर्वी ७ सहस्र ख्रिस्त्यांची हत्या
‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर सिव्हिल लिबर्टीज अँड द रूल ऑफ लॉ’च्या एका अहवालानुसार नायजेरियामध्ये यावर्षी जानेवारी ते १० ऑगस्ट पर्यंत धार्मिक हिंसाचार वाढल्यामुळे ७ सहस्रांहून अधिक ख्रिस्त्यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्यांसाठी ‘बोको हरम’ आणि ‘फुलानी’ यांसारख्या आतंकवादी संघटना उत्तरदायी आहेत.
ट्रम्प यांनी आधीच दिली होती चेतावणी !
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी २ नोव्हेंबर या दिवशी ‘जर नायजेरियामध्ये ख्रिस्त्यांची हत्या आणि त्यांच्यावरील आक्रमणे थांबली नाहीत, तर अमेरिका नायजेरिया सरकारला दिली जाणारी सर्व आर्थिक आणि सैनिकी साहाय्य त्वरित थांबवेल. तसेच आवश्यकता भासल्यास, अमेरिका बंदुकीसह नायजेरियामध्ये कारवाई करील. आम्ही ख्रिस्त्यांवर आक्रमण करणार्या आतंकवाद्यांना संपवू. युद्ध विभागाला संभाव्य सैनिकी कारवाईच्या सिद्धतेचे आदेश दिले आहेत.
संपादकीय भूमिका
|
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !