
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव दिव्य, अद्भुत, अप्रतिम, अद्वितीय, असाधारण आणि अत्यंत ज्ञानप्रद असा होता. हिंदूंवर भूतकाळात झालेले, वर्तमानकाळात होत असलेले आणि भविष्यातील संभाव्य धोके महोत्सवात आलेल्यांनी चांगल्या प्रकारे समजून घेतले. या धोक्यांचा कशा प्रकारे सामना करायचा ? हेही समजून घेतले. सनातन धर्म बळकट करण्यासाठी हा महोत्सव निश्चितच महत्त्वाचा ठरेल. मागील २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदु धर्माकरता अविरत कार्यरत आहे, यासाठी संस्थेला कोटी कोटी प्रणाम ! सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कार्याला कोटी कोटी वंदन !
– श्री. आलोक तिवारी, उपाध्यक्ष, जांबाज हिंदुस्थानी, प्रयागराज, उत्तरप्रदेश
राष्ट्राचे संरक्षण केवळ सीमांवरच नव्हे, तर विचार, संस्कृती आणि चेतना यांच्या पातळीवरही आवश्यक ! – धर्मेंद्र दुबे, रूद्रपूर, उत्तराखंड

मला सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात उपस्थित रहाण्याचे सौभाग्य मिळाले. हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायक, विचारप्रवर्तक आणि राष्ट्रभावनेने ओतप्रोत होता. या कार्यक्रमातून सनातन राष्ट्राचा उद्घोष आणि सनातन राष्ट्र-संकल्प ज्या प्रतिष्ठेने अन् स्पष्टतेने सादर केला गेला, ते खरोखरच प्रशंसनीय आहे.
विशेषतः देशाच्या सुरक्षेशी संबंधित भाषणे अत्यंत प्रभावी होती. यामुळे हे स्पष्ट झाले की, राष्ट्राचे संरक्षण केवळ सीमांवरच नव्हे, तर विचार, संस्कृती आणि चेतना यांच्या पातळीवरही आवश्यक आहे. शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाने आपल्या गौरवशाली इतिहासाच्या स्मृतींना पुनरुज्जीवित केले आणि हे शिकवले की, खरा योद्धा तोच असतो जो आपले देशबांधव अन् धर्मबांधव यांच्या रक्षणासाठी संघर्ष करतो आणि समाजाला नवी दिशा देतो. राष्ट्राला पुन्हा गौरवशाली बनण्यासाठी स्वत:चा वेळ, ऊर्जा आणि जीवन समर्पित करणार्या सनातनच्या साथीदारांचे आभार !
या आयोजनाने आम्हाला ही जाणीव करून दिली की, सनातन संस्कृती केवळ भूतकाळ नाही, तर वर्तमान आणि भविष्य यांची मार्गदर्शक आहे. मी सनातन संस्था आणि सर्व सनातनचे साथीदार यांचे मनःपूर्वक आभार मानतो, ज्यांनी राष्ट्राला पुन्हा त्याच्या गौरवशाली स्वरूपापर्यंत पोचवण्यासाठी स्वत:चा वेळ, ऊर्जा आणि जीवन समर्पित केले आहे. त्यांची निष्ठा आणि समर्पण आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. माझी नम्र अपेक्षा आहे की, अशा कार्यक्रमांचे आयोजन भारताच्या प्रत्येक गावात, शहरात आणि जिल्हा पातळीवर केले जावे, जेणेकरून अधिकाधिक सनातनप्रेमी राष्ट्रनिर्माणाच्या या महायज्ञात सहभागी होऊ शकतील आणि भारताला भव्य, सशक्त अन् सांस्कृतिकदृष्ट्या जागृत राष्ट्र बनवण्यात स्वत:चे योगदान देऊ शकतील.
जय जय सनातन ! जय जय हिंदु राष्ट्र !!
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवामुळे हे सिद्ध झाले की, भारताची सनातन चेतना अद्यापही जिवंत आहे. या महोत्सवामध्ये सहभागी झालेले धर्मनिष्ठ हिंदू आपापल्या स्तरावर धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांना सशक्त करण्याचे अद्भुत अन् प्रेरणादायी कार्य करत आहेत. हा महोत्सव केवळ एक कार्यक्रम नाही, तर विचार, साधना आणि संघटन यांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माण करण्याचा संकल्प आहे. शंखनादाच्या प्रतिकात्मक स्वरांनी आत्मबोध, सांस्कृतिक स्वाभिमान आणि राष्ट्र-धर्म यांविषयीची चेतना जनतेपर्यंत पोचवली. अशा प्रकारचे कार्यक्रम हिंदूंना संघटित करण्यासह राष्ट्रालाही नवी दिशा आणि दृष्टी प्रदान करतात. अशा प्रकारचा कार्यक्रम सकारात्मक, दिव्य आणि ऊर्जावान चेतना निर्माण करतो, जो भारताला पुन्हा सनातन राष्ट्राकडे नेण्यासाठी अग्रणी ठरेल.
– श्री. कुलदीप तिवारी, संस्थापक, जनउद्घोष सेवा संस्थान आणि श्रीकृष्ण जन्मभूमी अन् भोजशाळा प्रकरणातील याचिकाकर्ते
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !