‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’ची मागणी
(झारीतील शुक्राचार्य म्हणजे एखाद्या मोठ्या संकटाच्या किंवा चुकीच्या कामाच्या वेळी योग्य व्यक्तीने हस्तक्षेप करून ते थांबवायला हवे होते; पण त्या व्यक्तीने दुर्लक्ष केले, अशा व्यक्तीला दिलेला उपरोधिक टोमणा !)

मुंबई, १९ डिसेंबर (वार्ता.) – नशाविरोधी संघर्ष अभियान, तसेच अनेक सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिक यांचा प्रचंड विरोध डावलून मुंबईमध्ये ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला अनुमती देण्यात आली. हा प्रश्न केवळ संगीत महोत्सवाचा नाही, तर नशा, कायदा, बालसुरक्षा आणि प्रशासन यांच्या भूमिकेचा आहे. विविध संघटनांनी अनेक आंदोलने, निदर्शने करूनही, तसेच निवेदने देऊनही व्यसनाधीनतेला पाठबळ देणार्या कार्यक्रमांना सर्रास अनुमती मिळते, हे निषेधार्ह आहे. देश नशेच्या गर्तेत जाण्यापासून रोखण्याऐवजी अशा कार्यक्रमांना अनुमती देणारे ‘झारीतील शुक्राचार्य’ शोधून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’च्या सौ. धनश्री केळशीकर यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’च्या वतीने १९ डिसेंबर या दिवशी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी ‘मोकळा श्वास फाउंडेशन’चे संयोजक श्री. राजेश सावंत उपस्थित होते.
सौ. धनश्री केळशीकर म्हणाल्या,
१. अभियानाच्या वतीने ५० हून अधिक महाविद्यालयांत प्रबोधन करून शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय पोचवण्यात आला. मुंबईचे पोलीस आयुक्त, ‘नार्कोटिक डिपार्टमेंट’चे उपायुक्त, मुंबई पोर्ट ट्रस्टचे वरिष्ठ अधिकारी, वाहतूक पोलीस यांना प्रत्यक्ष भेटून हा कार्यक्रम रहित करण्याची मागणी करण्यात आली; परंतु या सर्व प्रशासकीय यंत्रणेकडून आम्हाला अत्यंत दुर्लक्षित प्रतिसाद मिळाला, हे धक्कादायक आह.
२. नार्कोटिक विभागाच्या अधिकार्यांना ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ (मद्यपान करून वाहन चालवणे) प्रकरणांवर विशेष लक्ष देण्याची मागणी करण्यात आली असता त्यांनी ‘आता लोक ‘ओला’, ‘उबेर’ने येतात. त्यामुळे तो प्रश्नच नाही’, असे उत्तर मिळाले.
३. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पोलीस आणि राज्याचे मुख्य सचिव यांना या कार्यक्रमाविषयी पाठवलेल्या नोटिसीला साधे उत्तर देण्याची औपचारिकताही दाखवली नाही. एकंदर हा सर्व प्रकार संशयास्पद आहे.
हेही वाचा → #BOYCOTT SUNBURN : ‘सनबर्न’ देशातून कायमचा हद्दपार करा ! – नशाविरोधी संघर्ष अभियान
अमली पदार्थांच्या सामाजिक दुष्परिणामांविषयी प्रशासनाची अनास्था ! – राजेश सावंत, संयोजक, ‘मोकळा श्वास फाउंडेशन’
अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक (मेंदू आणि मन यांच्यावर परिणाम करणे) पदार्थ कायद्याच्या अंतर्गत १६ वर्षांखालील मुलांची कार्यक्रमाला उपस्थिती हा गुन्हा आहे. यापूर्वीच्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या ठिकाणी झालेले मृत्यू, अमली पदार्थ तस्कर सापडणे, करचुकवेगिरीचे आरोप यांविषयी कोणती प्रतिबंधात्मक कारवाई झाल्याचे दिसत नाही, हे सर्वांत गंभीर आहे. प्रशासनाचा हा थंड प्रतिसाद नशेच्या सामाजिक दुष्परिणामांविषयीची पूर्ण अनास्था दर्शवतो. नशा म्हणजे केवळ वाहन चालवणे नाही, तर हिंसा, लैंगिक गुन्हे, मृत्यू, आरोग्याचे धोके आणि गुन्हेगारी यांची साखळी आहे. मानवाधिकार आयोगाच्या नोटिशीकडे दुर्लक्ष का ? अल्पवयीन मुलांचे संरक्षण कोण करणार ? दोषींवर कारवाई का होत नाही ? असे अनेक प्रश्न या माध्यमातून उपस्थित होतात.
नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या सरकारकडे मागण्या ! |

‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !