
मुंबई : नेहमीच वादग्रस्त राहिलेला आणि गोवा, पुणे येथून हद्दपार झाल्यानंतर ‘सनबर्न फेस्टिव्हल’ यावर्षी शिवडी, मुंबई येथे १९ ते २१ डिसेंबरला होणार आहे. सर्वांगाने कुप्रसिद्ध असलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ तात्काळ रहित करा, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र भूमीतून आणि देशातूनच कायमचा हद्दपार करावा, या मागणीसाठी १८ डिसेंबर या दिवशी शिवडी येथे ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’च्या वतीने जनआंदोलन करण्यात आले. या वेळी युवक, राष्ट्रप्रेमी नागरिक आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
🚫🔥 “Banish Sunburn permanently from India!” – Nasha-Virodhi Sangharsh Abhiyan
The controversial Sunburn Festival, earlier forced out of Goa & Pune, is now planned in Sewri, Mumbai (Dec 19–21).
✊ On Dec 18, a strong public protest demanded its immediate cancellation and… pic.twitter.com/KYlu6TdeDL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 19, 2025
या वेळी ‘शिवडीवासीय एक बनो । सनबर्न का धिक्कार करो ।।’, ‘सनबर्न तेरी क्या पहचान । नशापान और नशापान ।।’, ‘सनबर्न तुने क्या किया । देश का पैसा लूट लिया ।।’, ‘युवाओं को जगाना है । सनबर्न को भगाना है ।।’, ‘सनबर्न हटवा । मुंबई वाचवा ।।’, ‘सनबर्न हटवा–देश वाचवा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या, तसेच आंदोलकांनी ‘सनबर्न’ला विरोध करणारे फलक हातात धरले होते.
हे ही वाचा → Ban SUNBURN : ‘सनबर्न फेस्टिवल’च्या आयोजकांना ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’कडून कायदेशीर नोटीस ! |
दादर, वाशी, नेरूळ, वसई आणि विरार येथे गेल्या आठवड्यात ‘सनबर्न फेस्टिव्हल’ विरोधात ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’च्या वतीने आंदोलने करण्यात आली आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांसह महाराष्ट्रात विविध ठिकाणांहून या कार्यक्रमाला विरोध होत आहे.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !