चीनकडून घुसखोरी नाही !

नवी देहली – बांगलादेश सीमेवरून वर्ष २०१४ पासून म्हणजे गेल्या ११ वर्षांत ७ सहस्र ५२८ घुसखोर भारतात घुसले, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. याच काळात पाकिस्तान सीमेवरून ४२५ लोक बेकायदेशीरपणे देशात घुसले आहेत; मात्र चीन सीमेवर घुसखोरीचे कोणतेही प्रकरण अद्याप नोंदवले गेलेले नाही, अशी माहितीही राय यांनी दिली.
🚨 Shocking Border Reality! 🚨
📊 Central Govt data (last 11 years):
➡️ 7,528 infiltrators via the Bangladesh border
➡️ 298 infiltrators via the Myanmar borderZero infiltration from China!
🤔 With the visible scale of Bangladeshi infiltration, will the public really believe… pic.twitter.com/q3zipVWVXk
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 17, 2025
राय यांनी सांगितले की, भारताने सुरक्षा भक्कम करण्यासाठी आणि घुसखोरी रोखण्याच्या उद्देशाने भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेच्या ९३ टक्क्यांपेक्षा अधिक भागावर कुंपण घालणे पूर्ण केले आहे. भारत-बांगलादेश सीमेच्या सुमारे ७९ टक्के भागात कुंपण लावण्यात आले आहे. भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेची एकूण लांबी ४ सहस्र ९६ किलोमीटर आहे. यापैकी ३ सहस्र २३९ किलोमीटरवर कुंपण घालण्यात आले आहे, सुमारे ८५५ किलोमीटर सीमेवर अद्याप कुंपण घालणे शेष आहे. भारत-म्यानमार यांच्या १ सहस्र ६४३ किलोमीटर लांबीच्या सीमेपैकी आतापर्यंत केवळ ९ किलोमीटर भागावर प्रत्यक्ष कुंपण घालण्याचे काम पूर्ण झाले आहे.
संपादकीय भूमिकाभारतातील बांगलादेशी घुसखोरांची संख्या पहाता या आकडेवारीवर जनता विश्वास ठेवणार का, हा प्रश्न आहे ! |
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती