
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – येथे १५ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या वेळी संपूर्ण परिसर ‘जय शिवराज, जय शंभूराजे’ अशा जयघोषाने दणाणून गेला. या प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज नसल्याने महाराष्ट्र कह्यात घेऊ, असे औरंगजेबाला वाटले होते; मात्र या ठिकाणी छावा उभा होता. छत्रपती संभाजी महाराज एकही लढाई हरले नाहीत. जर घात झाला नसता, तर या छाव्याला पकडण्याची हिंमत कुणामध्येही नव्हती.’’
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर, भाजपचे खासदार धनंजय महाडिक, भाजपचे आमदार डॉ. राहुल आवाडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांसह अन्य उपस्थित होते. या पुतळ्याची उंची जवळपास २५ फूट असून या कार्यक्रमासाठी शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन !

या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरातील ६२ कोटी ७७ लाख रुपयांच्या, तसेच ग्रामीण भागासाठी ५ कोटी ७५ लाख अन् औद्योगिक सांडपाणी प्रक्रियेसाठी ३६१ कोटी ३१ लाख रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘या पुढील काळात इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहीन, तसेच इचलकरंजी महापालिकेला थकित असलेला मूल्यवर्धित कराचा परतावा मिळेल. त्याची महापालिकेने काळजी करू नये.’’
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)