Sydney Beach Attack : इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीने प्रेरित आक्रमण ! – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान

सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण

ऑस्टेलियाचे पंतप्रधान अल्बनीज

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – सिडनी येथील आक्रमण इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीने प्रेरित असल्याचे दिसते. इस्लामिक स्टेटची विचारसरणी साधारण एक दशकापूर्वी अस्तित्वात आली. त्या वेळेपासून हे जग या द्वेषमूलक आणि कट्टरतावादी विचारसरणीचा सामना करत आहे, अशी प्रतिक्रिया ऑस्टेलियाचे पंतप्रधान अल्बनीज यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की,

आक्रमण करणार्‍यांपैकी एकाची वर्ष २०१९ मध्ये चौकशी झाली होती; परंतु त्या वेळी त्याला धोक्याच्या श्रेणीत ठेवले नव्हते आणि त्याच्यावर सतत पाळत ठेवली जात नव्हती. आता हे तपासणे आवश्यक आहे की, त्यानंतर तो अधिक कट्टर झाला होता का ? आम्ही ज्यूंविरोधी द्वेषाच्या निर्मूलनासाठी पूर्ण क्षमतेने काम करत आहोत. ही पुष्कळ जुनी समस्या आहे.

पाकिस्तान १०० टक्के आतंकवादी देश ! – गीर्ट विल्डर्स

गीर्ट विल्डर्स

ऑस्टेलियातील आतंकवादी घटनेवर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. नेदरलँडस्‌मधील ‘पार्टी फॉर फ्रिडम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी म्हटले की, पाकिस्तान हा शरीयत कायद्यानुसार चालणारा एक अत्यंत धोकादायक आणि मागासलेला देश आहे.

हे आक्रमण करून त्याने पुन्हा एकदा जगाला याची आठवण करून दिली. कुख्यात अल् कायदा आतंकवादी ओसामा बिन लादेन पाकिस्तानातच लपून बसला होता. पाकिस्तान १०० टक्के आतंकवादी देश आहे. हा एक नक्कीच नीच देश आहे. मला पाकिस्तानी मौलवींकडून (इस्लामच्या धार्मिक नेत्यांकडून) अनेक वेळा धमक्या मिळाल्या आहेत.