|

वार्ता – सौ. अपर्णा जगताप
नवी देहली – गोव्यात अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा वैचारिक पाया अधिक भक्कम करण्याच्या ध्येयाने देशाची राजधानी देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी ऐतिहासिक ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या जागतिक व्यासपिठावरून देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ३ सहस्रांहून अधिक प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर एकत्र येऊन राष्ट्र अन् धर्माच्या संरक्षणाचा भव्य संकल्प करणार आहेत. महाभारतात भगवान श्रीकृष्णाने युद्धापूर्वी पांचजन्य शंख फुंकून धर्मयुद्धाची घोषणा केली होती. त्याच प्रेरणेने देहलीच्या इंद्रप्रस्थ भूमीत (भारत मंडपम्मध्ये) १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत होणारा हा ‘शंखनाद’ सुप्त असलेल्या हिंदु समाजाला जागृत करण्यासाठी आणि ‘सनातन राष्ट्रा’चा (रामराज्याचा) संकल्प करण्यासाठी आहे, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी सांगितले. श्री. अभय वर्तक यांनी ‘हिंदुस्तान पोस्ट’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत या महोत्सवाचे महत्त्व आणि स्वरूप सविस्तर स्पष्ट केले असून हा सोहळा राष्ट्रजागृतीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरणार आहे !
शंखनाद काळाची आवश्यकता; देहलीच का ?
श्री. अभय वर्तक यांनी देहलीतील आयोजनामागील भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, देहली ही भारताची राजधानी आहे, तिथे देशाचे निर्णय घेतले जातात. आज देशासमोर बाह्य आणि अंतर्गत सुरक्षेची आव्हाने उभी आहेत. पूर्वांचल, केरळ, काश्मीरसह अनेक ठिकाणी आजही हिंदू असुरक्षित आहेत. धर्मांतराचे प्रकार वाढत आहेत. तेव्हा वरवर उपाय काढण्यापेक्षा व्यवस्थेत आणि विचारसरणीत ‘सात्त्विक’ पालट होणे आवश्यक आहे. शंखनाद दोन प्रसंगी केला जातो. एक देवपूजेच्या वेळी सत्त्वप्रधान लहरी वाढवण्यासाठी आणि दुसरा कुरुक्षेत्रावर (युद्धभूमीवर) युद्धाच्या सिद्धतेसाठी ! सध्या देश विविध संकटांचा सामना करत असतांना सनातन राष्ट्राचा विचार रुजवणे, ही काळाची आवश्यकता आहे.
‘जी-३०००’चा भव्य संकल्प !
हा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ ज्या ‘भारत मंडपम्’ सभागृहात होत आहे, तेथेच पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘जी २०’सारखे जागतिक संमेलन पार पडले होते. त्याच ऐतिहासिक व्यासपिठावरून सनातन राष्ट्राच्या विचारांचे समर्थन करणार्या संघटनांच्या अनुमाने ३ सहस्र प्रतिनिधींचा महासंगम १४ डिसेंबरला होणार आहे. एका अर्थाने ‘जी-३०००’चा हा भव्य संकल्प देहलीत होत असून हा सोहळा राष्ट्र-धर्माच्या विचारांना जागतिक स्तराचे महत्त्व मिळवून देणारा एक अविस्मरणीय क्षण ठरेल.
संतांचे आध्यात्मिक तेज आणि मान्यवरांच्या सामाजिक कार्याचा ‘त्रिवेणी संगम’ !
राष्ट्रकार्यात सक्रीय असणारे मान्यवर, जसे की केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, देहलीचे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री श्री. कपिल मिश्रा, देहलीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, तसेच लेफ्टनंट जनरल (निवृत्त) खंदारे, मूर्तीकार अरुण योगीराज आणि अन्य अनेक मान्यवर उपस्थित असतील. साधू-संतांच्या आशीर्वादाविना धर्मकार्य पूर्ण होऊ शकत नाही. या महोत्सवात ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज आणि सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ उपस्थित राहून समाजाला दिशादर्शन करतील. ‘सुदर्शन टीव्ही’चे प्रमुख संपादक श्री. सुरेश चव्हाणके, काशी-मथुरा मुक्तीसाठी लढणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांसारखी दिग्गज मंडळी एकाच व्यासपिठावर येणार आहेत. संतांचे आध्यात्मिक बळ आणि या मान्यवरांचे सामाजिक कार्य यांचा त्रिवेणी संगम म्हणजे हा महोत्सव असेल !
दोन दिवसांच्या सत्रांचे स्वरूप ! : या दोन दिवसांत होणार्या चर्चासत्रांची विभागणी २ मुख्य विषयांमध्ये केली आहे.
१३ डिसेंबर : या दिवशी देशासमोरच्या नक्षलवाद, इस्लामी आतंकवाद, भ्रष्टाचार अशा आव्हानांवर आणि भूमीवरील आक्रमणांवर ‘सनातन भारताची सुरक्षा’ या अंतर्गत मंथन होईल.
१४ डिसेंबर : या दिवशी संस्कृतीवरील आक्रमणांवर ‘संस्कृतीरक्षण’च्या अंतर्गत विविध चर्चासत्रे असतील.
भव्य प्रदर्शन सर्वांसाठी खुले (१३ ते १५ डिसेंबर) !
भारत मंडपम् येथील सभागृह क्र. १२ ए मध्ये ३ दिवसीय (१३, १४ आणि १५ डिसेंबर) भव्य प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेची ‘कोर हेरिटेज’, (पुणे) या संस्थेकडील ४० सहस्र शस्त्रांच्या खजिन्यातील ८० ते ९० अद्भुत आणि विज्ञाननिष्ठ शस्त्रे पहायला मिळतील. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कार्यावर आधारित प्रदर्शनातून अनेकांना प्रेरणा मिळेल. सोमनाथच्या गुरुत्वाकर्षणमुक्त शिवलिंगाचा भाग हा प्रदर्शनातील सर्वांत मोठे आकर्षण आहे. १ सहस्र वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक शिवलिंगाचा हा भाग असेल. महंमद गझनीच्या आक्रमणातून पुजार्यांनी गुप्तस्थळी सुरक्षित ठेवलेल्या या शिवलिंगाचे वैशिष्ट्य हे आहे की, त्यात अत्यंत दुर्मिळ असे चुंबकीय स्वरूप असल्याने गुरुत्वाकर्षणाचा नियम त्याला लागू होत नाही. प्राचीन भारतीय अध्यात्म आणि विज्ञान यांची अलौकिक क्षमता दर्शवणार्या या अद्वितीय अन् चमत्कारी शिवलिंगाचे थेट दर्शन घेण्याची सुवर्णसंधी देहलीतील महोत्सवात उपलब्ध असेल.
सनातन राष्ट्र म्हणजे ‘धर्मरक्षणाचे दायित्व’ !
सनातन राष्ट्राची भूमिका स्पष्ट करतांना श्री. वर्तक यांनी सांगितले की, आज वर्ष २०२५ मध्ये राममंदिर पूर्ण झाले असले, तरी काशी-मथुरा शेष आहेत, धर्मांतर आणि अनेक राज्यांत हिंदूंची असुरक्षितता कायम आहे. जगात अनेक राष्ट्रे धर्माला सरकारी आधार देतात; पण ‘सेक्युलर’ भारतात मात्र सरकार मंदिरांना साहाय्य करण्याऐवजी शिर्डी, तुळजाभवानी अशा प्रमुख मंदिरांचे धन कह्यात घेत आहे. आज ‘सेक्युलर’ भारतात एकही हिंदु/सनातन राष्ट्र नाही; त्यामुळे केवळ ‘सेक्युलर’ न रहाता धर्माला राष्ट्राचा आधार देणारा ‘सनातन राष्ट्र’ हा विचार शास्त्रशुद्ध आणि घटनात्मक आहे. संतांच्या भाकितानुसार वर्ष २०२५ नंतर विश्वाची परिस्थिती पालटेल आणि सनातन राष्ट्रासाठी अनुकूल काळ येईल. त्यामुळे राष्ट्रासाठी अध्यात्म हाच पाया आहे, हे सिद्ध करत ‘सनातन’ (नित्य नूतन) हा विचार खंडित होऊ शकत नाही आणि लवकरच संपूर्ण विश्व अध्यात्म शिकण्यासाठी पुन्हा भारताकडे येईल, हा संदेश देण्यासाठीच हा महोत्सव आहे.
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
Panchkula Bomb Threat : पंचकुला (हरियाणा) महापौर कार्यालयासह हरियाणा आणि देहलीतील मंदिरे बाँबने उडवण्याची धमकी
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू