निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे-पाटील यांचे सूफी संमेलनात ब्राह्मणद्वेषी विधान !

बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदु हा ब्राह्मणांचा धर्म आहे. परकियांनी दिलेली शिवीगाळ म्हणजे हिंदू. या शब्दाचा अर्थ सांगण्याचे काम केले जात नाही. ब्राह्मणांनी त्यांच्या बुद्धीच्या बळावर आम्हा सर्वांना गुलाम बनवले. सर्व संत आणि मौलवी यांनी याविषयी सांगण्याचे काम केले पाहिजे. हिंदूचा अर्थ समजावून सांगायला अजून वेळ आहे, असे विधान निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांनी केले. ते बीदर जिल्ह्यातील बसवकल्याण शहरात सूफी संत संमेलनात बोलत होते. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे सदस्य सलीम अहमद यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
“Brahmins created Hindu Dharma by enslaving us!” – Retd. Judge B.G. Kolse-Patil spews ant!-Brahmin h@tred at a Sufi event
⚠️These so-called 'progressives' – in reality regressives – are blinded by the jaundice of ant!-Brahm!nism.
🚨This h@tred is their oxygen, keeping their… pic.twitter.com/jidosNrH6K
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 12, 2025
‘सर्वज्ञानी’ कोळसे-पाटील यांची संघ आणि ब्राह्मण द्वेषी विधाने !
(म्हणे) ‘सर्व दंगलींना रा.स्व. संघ उत्तरदायी !’
शिखांसह सर्व दंगलींचे मूळ कारण रा.स्व. संघ आहे. त्यांचा एक नेता इंदिरा गांधी यांना ‘दुर्गा’ म्हणून संबोधायचा. (ही अफवा होती, असे या नेत्याने स्पष्टीकरण दिलेले आहे, हे कोळसे पाटील का सांगत नाहीत ? यातूनच खोटे बोला; पण रेटून बोलाची त्यांची मानसिकता स्पष्ट होते ! – संपादक) संघानेच या दंगली चालू केल्या; पण या सर्वांचे आरोप काँग्रेसवर येणे अतिशय चुकीचे आहे. (वर्ष १९८४ ची देहलीतील शीखविरोधी दंगल कुणी केली, हे जगाजाहीर असतांना कोळसे-पाटील उघड खोटे बोलत आहेत ! – संपादक) त्यामुळे सर्वांनी इतिहास वाचला पाहिजे.
मी वर्ष १९७६ पासूनच ‘आम्हा सर्वांना होणारे दुःख आणि वेदना यांना संघच उत्तरदायी आहे’, असे सांगत आलो आहे; पण कुणालाही संघाविरुद्ध बोलण्याचे धाडस नाही. गेल्या १० ते १२ वर्षांपासून ते सत्ता चालवत आहेत. यापूर्वीही त्यांनी सत्ता चालवली आहे. राज्यघटनेच्या बळावर सत्तेत आलेले लोक आज त्याच राज्यघटनेला पायदळी तुडवण्याचे काम करत आहेत. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी नसलेल्या या लोकांनी देशासाठी कोणतेही चांगले काम केलेले नाही. (जे काँग्रेसवाले स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते, त्यांनीच देशाची फाळणी केली, हे कसे विसरता येणार ? – संपादक)
(म्हणे) ‘संघ आणि ब्राह्मण यांच्याविरुद्ध धारिष्ट्याने बोला !’ – मुसलमानांना आवाहन
तुम्ही हवे असल्यास ब्राह्मणवादाचा इतिहास पाहून जाणून घ्या. संत आणि सूफी यांनी याबद्दल जाणून घेऊन बोलले पाहिजे. जर तुम्ही धैर्याने बोलला नाहीत, तर ते तुम्हाला सोडणार नाहीत. ते देशात केवळ १ टक्का आहेत. तुम्ही (मुसलमान) संघ आणि ब्राह्मण यांच्याविरुद्ध बोलण्यास घाबरू नका. आज आपण सर्वांनी एकजूट होऊन सर्वांमध्ये मिसळले पाहिजे. यापूर्वी मुसलमानांनी देशावर राज्य केले होते. त्यामुळे मुसलमानांनी सर्वांशी समन्वय साधला पाहिजे. सर्वांना समवेत घेऊन राजकारण केले पाहिजे. हे राजकारण हिंदूंच्या विरुद्ध नाही, केवळ संघ आणि ब्राह्मण यांच्याविरुद्ध केले पाहिजे. (दंगलीच्या वेळी धर्मांध मुसलमान संघ आणि ब्राह्मण नाही, तर हिंदू म्हणून प्रत्येकावर आक्रमण करतात, हे कोळसे-पाटील का सांगत नाहीत ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी