लोकसंख्या नियंत्रणासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून हिंदूंना फुकाचा सल्ला !

धारवाड (कर्नाटक) – आपण सगळे माणूस आहोत आणि माणूस म्हणून जगायला हवे. या पार्श्वभूमीवर आंतरजातीय विवाह अधिकाधिक व्हायला हवेत. आंतरजातीय विवाहांमुळे समानता येते. देशात लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकाने १ किंवा २ अपत्ये जन्माला घालावीत, असा सल्ला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला आहे. आमदार कोनारेड्डी यांचे पुत्र नवीन यांच्या विवाहाचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याचवेळी इतर ७५ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळाही आयोजित करण्यात आला होता. या समारंभात मुख्यमंत्र्यांनी भाग घेऊन हा सल्ला दिला.
🚨 Hypocrisy Alert! 🚨
Karnataka CM Siddaramaiah lectures Hindus on “population control.”
But the real demographic surge is elsewhere – where 4 marriages & dozens of children are encouraged! 📈
Why is the CM afraid to say that publicly? 😶#AppeasementPolitics #HinduVoice pic.twitter.com/nfcTQ8eZMo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 10, 2025
येथे सिद्धरामय्या म्हणाले की,
१. कोनारेड्डी यांनी केवळ मुलाचे लग्न न करता ७५ जोडप्यांसाठी सामूहिक विवाह आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला एक लाखांहून अधिक लोकांना एकत्र केले आहे. हे केवळ लग्न नसून एका मोठ्या जत्रेसारखे वाटत आहे, असे त्यांनी वर्णन केले. (सामूहिक विवाह अल्प खर्चाच्या दृष्टीने चांगला असला, तरी यातून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होत आहे, असे जनतेला वाटते ! – संपादक)
२. मुसलमान आणि ख्रिस्ती पंथाचे लोक हिंदूंसमवेत विवाह करत आहेत. (यामागे लव्ह जिहाद आहे. अन्य काही नाही, हे सिद्धरामय्या सांगत नाही, हे लक्षात घ्या ! किती मुसलमान आणि ख्रिस्ती तरुणी हिंदु तरुणांसमवेत विवाह करतात, याची आकडेवारी सिद्धरामय्या देतील का ? – संपादक)
संपादकीय भूमिकाहा नियम केवळ हिंदूंनाच लागू होतो का ? वास्तविक हिंदूंना या सल्ल्याची आवश्यकताही नाही; कारण बहुसंख्य हिंदू हे १ किंवा २ मुलांनाच जन्माला घालतात. ४ विवाह करून ढीगभर मुलांना जन्माला घालणार्या मुसलमानांना मुख्यमंत्री हा सल्ला का देत नाहीत ? |
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री