फरीदाबाद (हरियाणा) येथील पत्रकार परिषद

फरीदाबाद – ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या धाडसी मोहिमांपासून ते चौथ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होईपर्यंतचा प्रवास भारताने केला आहे; मात्र देशाला अद्यापही आतंकवादाचा धोका आहे. देशविरोधी विदेशी शक्तीही डीप स्टेट, नक्षलवाद, विघटनवादी, घुसखोरी, नॅरेटिव्ह (खोटे कथानक) युद्ध, लव्ह जिहाद, हलाल जिहाद आदी माध्यमांतून भारताला खिळखिळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी भारताला दिखाऊ धर्मनिरपेक्षतेची नव्हे, तर प्रभु श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या क्षात्रतेजाची नितांत आवश्यकता आहे.
सुरक्षा, संस्कृती आणि शौर्य यांचे जागरण होण्यासाठी भारताने विश्वकल्याणकारी ‘सनातन राष्ट्र’ म्हणून उभे रहाणे अत्यावश्यक आहे. हा संदेश देशभर पोचवण्यासाठी ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ प्रस्तुत आणि ‘सनातन संस्था’ आयोजित भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ १३ आणि १४ डिसेंबर २०२५ या दिवशी नवी देहली (इंद्रप्रस्थ) येथील ‘भारत मंडपम्’मध्ये होणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
९ डिसेंबर या दिवशी अरावली गोल्फ क्लबमध्ये ही पत्रकार परिषद पार पडली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर एज्युकेशन अँड रिसर्च बालाजी ग्रुप ऑफ कॉलेज’चे अध्यक्ष श्री. जगदीश चौधरी आणि ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे प्रमुख कार्यवाह श्री. दिगंबर रैना उपस्थित होते.
🇮🇳 Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav – Delhi 2025
A nationwide call for India to rise as a ‘Sanatan Rashtra’! – @1chetanrajhans, National Spokesperson, @SanatanSanstha
At the Faridabad press conference, it was recalled that the first Shankhnad Mahotsav in Goa, held during… pic.twitter.com/qcV2Z1zV0T
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 10, 2025
सनातन संस्थेचे श्री. चेतन राजहंस म्हणाले,

‘‘सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्ष, तसेच रामराज्यासम ‘सनातन राष्ट्र’ स्थापनेसाठी कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त गोव्यात पहिला ‘शंखनाद महोत्सव’ झाला. त्याला २३ देशांतील ३० सहस्रांहून अधिक भाविकांची अभूतपूर्व उपस्थिती, अनेक साधू-संत, गोव्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांची उपस्थिती लाभली. महोत्सव यशस्वीरित्या पार पडला. त्यानंतर आता देहली होणारा हा महोत्सव राष्ट्र आणि संस्कृती यांच्या रक्षणाचा शंखनाद करणारा असेल.’’

‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी