काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी ५०० कोटी रुपयांची आवश्यकता  असते ! – Navjot Kaur Sidhu

काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीचे विधान

नवज्योत कौर सिद्धू

चंडीगड – काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी ५०० कोटी रुपयांची आवश्यकता  असते, असे विधान पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी अन् काँग्रेसच्या नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनी केले. यानंतर भाजप आणि आम आदमी पक्ष यांनी काँग्रेसवर टीका केली.

१. भाजपने म्हटले की, नवज्योत कौर यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या कारभाराचे ‘काळे सत्य’ उघड झाले आहे. तसेच काँग्रेस पक्ष ‘पैसा आणि मालमत्ता’ यांच्या राजकारणात गुंतलेला असल्याचा हा पुरावा आहे.

२. काँग्रेस खासदार तथा माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंह रंधावा म्हणाले की, नवज्योत कौर यांचे पती नवज्योतसिंह सिद्धू स्वतःच पक्ष देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आता नवज्योत कौर साहाय्य करत आहेत.

३. पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बालतेज पन्नू म्हणाले की, नवज्योत कौर यांनी काँग्रेसमधील भानगडी समोर आणल्या आहेत. काँग्रेस नेमकी कशी काम करते ?, ते या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे नेतृत्व कसे ठरते ?, तेदेखील यामुळे आपल्याला समजले. पंजाबपेक्षा त्यांना त्यांचा पक्ष, पैसा आणि वैयक्तिक लाभ महत्त्वाचे आहेत.

संपादकीय भूमिका

काँग्रेसचा कारभार कसा चालतो ?, हेच यातून उघड होते. असे राजकीय पक्ष कधीतरी देशातील भ्रष्टाचार नष्ट करू शकतील का ?