संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना खासदार प्रा.डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी माहिती देत केली कारवाईची मागणी

नवी देहली – पुणे येथील भाजपच्या खासदार प्रा.डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी नुकतीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन पुणे छावणी क्षेत्रातील केंद्र सरकार आणि छावणी (कँटोनमेंट बोर्ड) बोर्ड यांची भूमी बेकायदेशीरपणे वक्फ मालमत्ता घोषित केल्याचे गंभीर प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
⚠️ Land Jihad Alert in Pune! BJP MP Medha Kulkarni Raises Serious Concern ⚠️
After her strong intervention in Parliament on the halal certification issue, BJP MP @Medha_kulkarni has now exposed the illegal takeover of Central Govt and Army land in Pune by the Waqf Board.
She… https://t.co/e24iobg53A pic.twitter.com/1IFEy71kyb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 7, 2025
स्थानिक रहिवाशांकडून हे चिंताजनक सूत्र मांडण्यात आले असून येथील भूमी नोंदणीमध्ये झालेल्या अनियमितता, मालमत्तेचा कायदेशीर दर्जा पालटणे आणि संरक्षण मंत्रालयाच्या भूमी व्यवस्थापनाच्या प्रणालीला धोका निर्माण करणे असे गंभीर आरोप यात समाविष्ट आहे. या प्रकरणाची त्वरित आणि कालबद्ध चौकशी करून या गैरप्रकारावर अंकुश घालण्यात यावा, भूमीचा कायदेशीर दर्जा पुनर्संचयित करावा आणि दोषींविरोधात योग्य कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या खासदार प्रा.डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे या वेळी केल्या.
संपादकीय भूमिकावक्फ बोर्डाच्या माध्यमातून चालू असलेल्या या लँड जिहादचा फटका सरकार आणि सैन्य यांनाही बसत असल्यामुळे आता सरकारने या समस्येकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक ! |
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण