|

नवी देहली – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन भारताच्या दौर्यावर आल्यानंतर त्यांनी ५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात कोठेही दोन्ही देशांमध्ये कोणताही मोठा संरक्षण करार झालेला नाही, हे दिसून आले. भारत आणि रशिया यांमध्ये लढाऊ विमान आणि ‘एस्-५००’ ही हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्याविषयी करार होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
आम्ही भारताला शस्त्रास्त्रे पुरवत राहू ! – राष्ट्राध्यक्ष पुतिन
पुतिन म्हणाले की, जवळजवळ ५० वर्षांपासून रशिया भारतीय सैन्याला शस्त्रास्त्रे आणि आधुनिकीकरण करण्यात साहाय्य करत आहे; मग ते हवाई संरक्षण दल असो, विमान वाहतूक असो किंवा नौदल असो. रशिया आणि भारत हे दीर्घकाळापासून विश्वासार्ह व्यापारी भागीदार आहेत आणि दोन्ही देशांमधील व्यापार सातत्याने वाढत आहे. गेल्या ३ वर्षांत द्विपक्षीय व्यापारात विक्रमी ८० टक्के वाढ झाली आहे. रशिया कोणत्याही अडथळ्याविना भारताला तेलपुरवठा करत राहील. आज भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वायत्त धोरण राबवत आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. भारतात अनेक क्षेत्रांमध्ये मोठी क्षमता आहे; परंतु दोन्ही देशांनी अद्याप त्यांचा पूर्णपणे लाभ घेतलेला नाही.
भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री ध्रुव तार्यासारखी अढळ ! – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या ८ दशकांमध्ये जगाने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. या सर्व काळात भारत-रशिया मैत्री नेहमीच ध्रुव तार्यासारखी अढळ आणि स्थिर राहिली आहे.
Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत