‘कुंभमेळा म्हणजे काय आहे ? तिथे गांजा पिणारे साधू येतात !’, ही अक्कल असणार्या निरंजन टकले यांना भुलून काही हिंदु म्हणत आहेत, ‘एक वेळ कुंभमेळा रहित करा; पण वृक्षतोड थांबवा !’ निरंजन टकले यांना झाडांमधील काही कळत नाही. त्यांना ‘देशी प्रजातीची झाडे तोडणार नाही’, असे सांगितले, तर ते म्हणतात, ‘आता झाडांमध्ये जाती आणणार का ?’ यातूनच कळते की, यांना पर्यावरणाविषयी काही कळत नाही, म्हणजे झाडांच्या प्रजाती काय असतात ?, त्यांचे पर्यावरणातील महत्त्व (सिग्नीफिकन्स) काय असते ? हे यांना काही माहिती नाही; पण यांना झाडांचा मोठा पुळका आल्याप्रमाणे दाखवत आहेत ! अशांना हिंदु भुलत आहेत.

१. कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड : विरोधकांचे लक्ष्य भारतीय संस्कृती आणि कुंभमेळा
साम्यवाद्यांच्या खोट्या कथानकाने होणार्या बुद्धीभेदाची चांगलीच कल्पना हिंदुत्वनिष्ठांना आली आहे. ज्यांनी मुंबईतील मेट्रोसाठीच्या आरे कारशेड प्रकरणाचे भांडवल करून कसे निरर्थक रान पेटवले गेले होते, हेही हिंदुत्वनिष्ठांनी व्यवस्थित बघितले होते. अशा हिंदुत्वनिष्ठांना निरंजन टकले यांचे मूळ लक्ष्य कुंभमेळा आणि भारतीय संस्कृती आहे, हे चांगलेच ठाऊक आहे ! असे असूनही प्रकरण नेमके काय आहे, वृक्षतोड म्हणजे नेमके काय होणार आहे, याची कोणतीही माहिती न मिळवता आक्रोश चालू झाला आहे. वृक्षतोड म्हटली की, आधी डोळ्यांसमोर असंख्य डेरेदार वृक्षांचे जंगल असलेले चित्र उभे रहाते आणि दुसर्या चित्रात सगळे वृक्ष तोडून उजाड केलेली भूमी दिसते. साहजिक कोणताही समंजस मनुष्य यातून व्यथित होतो. स्वाभाविक पहिली प्रतिक्रिया म्हणून हे ठीक आहे; पण वास्तव जाणून घ्यायला हवे.
२. कोणत्या प्रकारची वृक्षतोड करण्यात येणार ?
प्रत्येक कुंभमेळ्याला साधुग्रामसाठी वापरला जाणारा परिसर हा पुष्कळ मोठा पडीक आहे. त्यामुळे मुळात किती झाडे तोडणार, याची संख्या स्वतः कुंभमेळ्याविषयीच्या प्रशासनालाही माहिती नाही. १७००, १८००, २००० वगैरे संख्या ही कोणत्याही खात्रीलायक माहितीच्या आधारे काढली गेली नाही. सध्या झालेले ‘मार्किंग’ (खुणा करणे) फक्त (आणि जे नेहमी होते) सर्व्हेसाठी केलेले होते की, जे नेहमी केले जाते. या सर्व्हेमधून कळणार की, किती झाडे तोडावी लागणार आहेत. जी तोडली जाण्याची शक्यता आहे, ती झाडे पर्यावरण संवर्धन करणारी आणि भूमीची धूप थांबणारी नसणार. उलट ती अधिक हानी करतात.
अ. काशीद, रेन ट्री, निलगिरी, अकेशिया ही सगळी बाहेरून आलेली प्रजाती आहेत, ज्यांची मुळे खोल नसल्याने मातीची धूप थांबत नाहीच, उलट सतत होणार्या पान गळतीमुळे खालच्या मातीवर सूर्यप्रकाश पडतच नाही आणि तिथे इतर पर्यावरण हितकारक झाडे उगवू शकत नाहीत. ही झाडे झपाट्याने वाढतात. त्यामुळे ती ‘वृक्ष’ वाटतात; पण ती अत्यंत ठिसूळ असतात. जैव विविधता वाढवण्यात यांचे योगदान शून्य असते. उलट यांच्यावर वाढणारे कीटक संपूर्ण स्थानिक परिसंस्था उद्ध्वस्त करतात. आजूबाजूच्या शेतीचीही हानी करतात. यांच्यामुळे भूमीतील पाण्याची पातळी आणि मातीचा स्तर दोन्ही खालावतो. अशी झाडे ज्यांचा भारताच्या मातीच्या पोताशी, इथल्या पर्यावरण संरचनेशी काहीही संबंध नाही. त्या प्रजातीच्या झाडांची तीही आवश्यकता भासल्यास तोड होणार आहे.
आ. रानमारी, गुलतुरा, बाभळी, कॉसमॉस अशी कित्येक झुडपे, जी निव्वळ झुडपेच आहेत ! ना पक्षांची घरटी, ना भूमीवर सावली, ना भूमीचा धूप न्यून करण्यात काही योगदान, अशी झाडे साफ होणार आहेत.
इ. या परिसरात रामसृष्टी उद्यानसारखी दाट झाडी असलेली अनेक ठिकाणे आहेत, तिथे वृक्षतोड होणार नाही.
ई. लक्ष्मण मंदिराच्या मागच्या भागातही प्रचंड प्रमाणात काटेरी बाभूळ, गुलतुरा आणि रानमारी पसरले आहेत. ते साफ होतील. काही भागात रान तुळस बेफाम पसरली आहे. ती साफ होईल. जिथे धानोरासुद्धा मोठा आणि दाट झाला आहे, तोही अत्यंत आवश्यक असेल, तिथेच साफ होऊन राहुट्या उभारण्यासाठी जागा होईल.
ही सफाई करतांना त्यात जी डेरेदार जुनी वृक्ष आहेत, ती तोडली जाणार नाहीत. वृक्षांची गंभीर हानी होईल, असे काहीच होणार नाही. काही अवाढव्य वृक्षांना खुणा केलेल्या आहेत, त्या ते पहाणीचा भाग म्हणून. प्रशासनाने वृक्षतोड होणार नाही, हे स्पष्ट केले आहे .

३. बेगडी पर्यावरणप्रेम
जागा साधूग्रामची ! वर्षानुवर्षे कुंभमेळ्यासाठी जवळचा जाण्याचा मार्ग असलेली जागा आहे. निरंजन टकले हे उद्या साधूंना अन्यत्र कुठेही जागा दिली आणि तिथे झुडप उगवले, तरी ‘कुंभमेळा दुसरीकडे न्या’, असे म्हणतील.
चित्रावर क्लिक करा |
‘बंद करा कुंभमेळा ?’, याविषयीचे विचार हिंदूंच्या मनात यावेत, कुंभ आणि भारतीय संस्कृती यांच्याविषयी किळस निर्माण व्हावी, हेच यांचे हेतू आहेत. आपण काही हिंदू त्यांच्या बेगडी पर्यावरणप्रेमाला भुलून त्यांचे अंतःस्थ हेतू साध्य करून देत आहोत. झाडे आपल्याला प्रिय असतातच, अनावश्यक वृक्षतोड कुणालाच नको असते; पण आपली कळकळ कारण नसतांना लक्ष्य करून वेगळेच डाव साधले जात आहेत, हे एव्हाना आपल्याला समजायला हवे. ‘यांचे बेगडी वृक्षप्रेम निव्वळ बहाणा आहे, मुख्य निशाणा कुंभमेळा आणि भारतीय संस्कृती आहे’, हे हिंदूंना कळायला हवे.
– ओंकार दाभाडकर, डोंबिवली (१.१२.२०२५)
| संपादकीय भूमिका : हिंदूंनी ‘भारत शिक्षणात मागास होता’, ‘कुंभमेळ्यामुळे पर्यावरणाची हानी होते’, ही कथानके आहेत, हे लक्षात घ्यावे ! |

कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?