
मुंबई – बकरी ईदच्या वेळी हे पर्यावरण आणि प्राणी प्रेमी गप्प का असतात ? कुंभमेळा हा हिंदूंसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा आहे. हे तथाकथित पर्यावरण आणि प्राणी प्रेमी अन्य धर्मांच्या उत्सवांवर कधीही असे प्रश्न उपस्थित करत नाहीत. देशात खरोखरच सर्वधर्मसमभाव असेल, तर केवळ हिंदूंच्याच सण-उत्सवांवर हरकती का घेतल्या जातात ? ईदच्या वेळी मोठ्या प्रमाणात बकर्यांची हत्या होते, रक्ताचे पाणी रस्त्यांवर वहाते, पर्यावरण आणि स्वच्छता यांचा प्रश्न निर्माण होतो; पण त्याविरोधात हे ‘प्रेमी’ कधी बोलतांना दिसत नाहीत. ‘व्हर्च्युअल’ (आभासी) बकरी ईद साजरी करा’, असे कुणी म्हणत नाही. मग एका धर्माला एक न्याय आणि दुसर्या धर्माला दुसरा न्याय का ? झाडाला मिठी मारता तशी बकरीला मारता का ? बकरीला मिठी मारून तिची हत्या थांबवून दाखवावी, अशा सडेतोड प्रश्नांची सरबत्ती भाजपचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पर्यावरणप्रेमींवर केली.
तपोवन मधल्या वृक्ष थोड ची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच..
ईद च्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत..
तेव्हा गप्प का ?
सर्व धर्म सम भाव ?— Nitesh Rane (@NiteshNRane) December 4, 2025
नाशिक येथे होणार्या कुंभपर्वासाठी साधूग्रामची उभारणी करण्यासाठी काही वृक्ष तोडावे लागणार असल्याने कथित आणि ‘राजकीय’ पर्यावरणप्रेमींनी त्याला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
📍 पत्रकार परिषद
०४ डिसेंबर २०२५ | मुंबई pic.twitter.com/NQErFjjVs8— Nitesh Rane (@NiteshNRane) December 4, 2025
ते या वेळी म्हणाले की, झाडे जगली पाहिजेत, यात दुमत नाही. समितीने अत्यंत विचारपूर्वक आणि काटेकोर निर्णय घेतला आहे. पर्यावरणप्रेमाच्या नावाखाली कुंभपर्व आणि हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचा डाव चालू आहे. लोकांच्या खांद्यावर बंदुक ठेवून हिंदु धर्माला लक्ष्य केले जात आहे. हा भाजप किंवा राष्ट्रवादी यांचा प्रश्न नाही; मी हिंदु म्हणून प्रश्न विचारत आहे. वृक्षतोडीला विरोध करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी ईदला किमान ५ बकर्यांची कुर्बानी तरी थांबवून दाखवावी. उत्तरप्रदेशातील महाकुंभाच्या वेळी ‘त्रिवेणी संगमातील पाण्याने खाज येते’ अशा अफवा पसरवल्या होत्या. हिंदूंच्या उत्सवाची अपकीर्ती करण्याचा हा डाव आहे.
राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील पद्धतीचा अभ्यास करणार ! – वनमंत्री गणेश नाईक
विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालक यांचे योगदान महत्त्वाचे ! – डॉ. ऋचा औरंगाबादकर
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !